
‘धर्म आणि अधर्म या संबंधात कसे वागावे ?’, याबद्दल एखाद्यास निर्णय घ्यायचा असेल, त्या वेळी मनातील सर्व राग, द्वेष आणि मत्सर शांतपणे बाजूला सारावेत. निर्विकार मनःस्थितीत यावे. अशा वेळी सर्व मानवांना आणि सर्व प्राण्यांना हितकर असा विवेकबुद्धीचा निर्णय प्रत्येकाला मिळू शकतो.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साभार : मासिक ‘घनगर्जित’, जुलै २०२१)