देशात अमली पदार्थविरोधी मोहीम चालू असून पाळेमुळे खणून काढणार ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

   मुंबई – राज्यात आणि देशात अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याविरुद्ध ‘नो टॉलरन्स फॉर ड्रग्ज’ (अमली पदार्थांच्या संदर्भात शून्य सहनशीलता) ही मोहीम अत्यंत तीव्र गतीने राबवली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले, ‘‘अन्वेषण यंत्रणांच्या माध्यमातून अचूक माहिती गोळा करून मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळे अमली पदार्थांच्या काळ्या जाळ्याची पाळेमुळे पूर्णपणे खणून काढता येतील.

जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे वाढलेला इंधन आणि गॅस दर म्हणजे जागतिक समस्या असून केंद्र सरकार या परिस्थितीकडे बारीक लक्ष ठेवून आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील.’’