स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याची लोकसभेच्या अध्यक्षांकडे मागणी !
सत्ताधारी ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’मध्ये सहभागी होण्याची इच्छा !

कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधीमंडळ गटात फूट पडल्यानंतर आता संसदीय पक्षातही फूट पडल्याचे समोर आले आहे. तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून संसदेत स्वतंत्र गटाला मान्यता देण्याची मागणी केली. यासह सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याचा मानसही व्यक्त केला. स्वाक्षरी करणार्यांमध्ये अरूप चक्रवर्ती, पार्थ भौमिक, शताब्दी रॉय, जगदीश बसुनिया, काकोली घोष दस्तीदार, प्रसून बॅनर्जी, कालीपदा सोरेन, शर्मिला सरकार, जून मालिया, बापी हलदार, असित मल आणि सुवेंदू शेखर रॉय यांचा समावेश असल्याचे समजते. बंडखोर गटाच्या नेत्या म्हणून काकोली घोष दस्तीदार यांना मान्यता देण्याची विनंतीही करण्यात आली आहे. २० बंडखोर खासदारांमध्ये भाजपचेच माजी नेते आणि नंतर तृणमूलमध्ये प्रवेश केलेले शत्रुघ्न सिन्हा आणि कीर्ती आझाद यांचाही समावेश आहे, हे विशेष.
स्वतंत्र गटाला मान्यता मिळवण्यासाठी लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिण्यापूर्वी बंडखोर सदस्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन् यांची भेट घेतली, राज्यसभेतील सदस्यपदाचे त्यागपत्र दिले आणि पक्ष सोडण्याची घोषणा केली.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण