मुसलमान आणि पारसी दोन्ही समाजांकडून दफनभूमी उपलब्ध करून देण्यास दिला नकार : शेवटी हिंदु स्मशानभूमीत अंत्यसंस्कार !
महिलेने केले नव्हते धर्मांतर !

कर्णावती (गुजरात) – एका मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या गुजरातमधील पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत राहिल्याचे समोर आले आहे. मुसलमान आणि पारसी दोन्ही समाजांनी दफनभूमी उपलब्ध करून देण्यास नकार दिल्याने तिचा मृतदेह शवगृहात पडून होता. मुसलमान पतीने काही मौलवींशी (इस्लामच्या धार्मिक नेत्यांशी) संपर्क साधला, तरी निकाह (इस्लाममधील विवाह) झालेला असूनही इस्लामी पद्धतीने तिच्या मृतदेहाचे दफन करण्यास अनुमती मिळाली नाही. यानंतर पतीने पारसी समुदायाशी संपर्क साधला; पण अंत्यसंस्कारास अनुमती मिळाली नाही. शेवटी सनातन रितीरिवाजांनुसार त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना गुजरातमधील नवसारी येथील आहे.
१. याविषयीच्या एका वृत्तानुसार, ३५ वर्षांपूर्वी नवसारीतील एका पारशी विद्यार्थिनीने मुसलमान प्राध्यापक निसार अहमद यांच्याशी निकाह केला होता.
२. पारसी समाजाने त्या विद्यार्थिनीला पारसी समुदायातून बाहेर काढले आणि कुटुंबानेही तिच्याशी नाते तोडले.
३. मृत महिलेने इस्लाम स्वीकारला नव्हता आणि ती झोरोस्ट्रियन धर्माचे पालन करत होती. दांपत्याला अपत्य नव्हते. अलीकडे ती आजारी पडली आणि ४ जून या दिवशी तिचा मृत्यू झाला.
४. मृत महिलेच्या बहिणीने सांगितले की, कुठलाही मार्ग न उरल्याने त्यांनी नवसारीचे समाजसेवक आणि विश्व हिंदु परिषदेचे नेते साजन भरवाड यांचे साहाय्य मागितले. सर्वांच्या सहमतीने हिंदु स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !