‘स्विगी आस्थापना’चा अन्नपुरवठ्याविषयी निष्काळजीपणा !

रत्नागिरी – ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ‘स्विगी’च्या निष्काळजी अन्नपुरवठ्याविषयी गंभीर सूत्र समोर आले आहे. अनेक वेळा खाद्यपदार्थ साध्या ‘ॲल्युमिनियम फॉईल’मध्ये, कोणतेही ‘टॅम्पर-प्रूफ सील’ किंवा सुरक्षा ‘स्टिकर’ नसतांना वितरित केले जात आहेत. या निष्काळजीपणाच्या विरोधात सायबर कायदातज्ञ अधिवक्ता अमित मधुकर नागवेकर यांनी ‘स्विगी’ आस्थापनाला कायदेशीर नोटीस बजावली आहे.
या नोटिसीत म्हटले आहे की,
१. ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ (FSSAI) आणि ‘एफ्.डी.ए.’ (FDA) च्या अन्नसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ग्राहकांपर्यंत पोचणारे अन्न स्वच्छ, सुरक्षित आणि छेडछाड रोखणारे सीलमध्ये (टॅम्पर-एव्हिडंट पॅकेजिंगमध्ये) असणे बंधनकारक आहे.
२. पदार्थ वितरणाच्या दरम्यान अन्नात भेसळ, दूषितीकरण किंवा कोणताही अनधिकृत हस्तक्षेप होऊ नये, यासाठी सुरक्षायंत्रणा आवश्यक आहे.
३. रत्नागिरीतील स्विगीशी जोडलेल्या सर्व भागीदार उपाहारगृहांचे तातडीने स्वच्छता आणि ‘पॅकेजिंग’ ऑडिट करण्यात यावे.
४. ‘स्विगी सील’ प्रणालीची जिल्ह्यात प्रभावी कार्यवाही व्हावी.
५. आस्थापनाचा गेल्या वर्षातील ‘हायजीन ऑडिट अहवाल’ सार्वजनिक करावा.
६. ही गोष्ट केवळ एका ग्राहकापुरती मर्यादित नसून थेट सार्वजनिक आरोग्य आणि ग्राहक सुरक्षेशी संबंधित आहे. सुरक्षित आणि मानकांनुसार सीलबंद पॅकेजिंगची काटेकोर कार्यवाही झाल्यास सहस्रो ग्राहकांच्या आरोग्याला असणारा संभाव्य धोका टळू शकतो.
७. स्विगी आस्थापनाने या नोटिसीला सकारात्मक आणि समाधानकारक उत्तर न दिल्यास या प्रकरणाचा पाठपुरावा थेट ग्राहक न्यायालय (ग्राहक आयोग), ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’, ‘एफ्.डी.ए.’आणि इतर सक्षम प्राधिकरणांकडे करून पुढील तीव्र कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !