Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण

बरेली (उत्तरप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण

स्वतःला हिंदु म्हणवून घेणारा अरबाज खान

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील महंमद अरबाज याने हिंदु नाव सांगून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर त्याने तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला आणि जिवे मारण्याची धमकीही दिली. पीडितेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिला दर्ग्यात नेऊन बलपूर्वक कलमा (अल्लाचा गौरव करणारी विधाने) वाचायला लावला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेणे चालू केले आहे.

१. पीडित तरुणीला स्वतःला हिंदु म्हणवून घेणारा वास्तविक अरबाज खान असून रोहली टोला येथील रहिवासी असल्याचे आणि तो आधीच विवाहित असून त्याला २ मुले असल्याचे समजले. जेव्हा तरुणीने विरोध केला, तेव्हा त्याने तिला मारहाण करण्यास चालू केले.

२. पीडितेने सांगितले की, अरबाज तिला शराफत मियांच्या दर्ग्यात घेऊन गेला. तिथे तिला बलपूर्वक कलमा वाचायला लावला आणि नमाजपठण करायला लावले. जेव्हा पीडितेने विरोध केला, तेव्हा अरबाज म्हणाला की, त्यांची एक मोठी टोळी आहे, ज्याचे कामच हिंदु मुलींना जाळ्यात ओढून त्यांना इस्लाम स्वीकारायला लावणे आहे.

३. पीडितेने असेही सांगितले की, अरबाजसोबतच त्याचा मित्र आरिश, त्याची बहीण सिमरन आणि मेहुणा राजा तिला सतत अपकीर्त करण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देत असत.