राजस्थान येथील घटना
(ट्रायल रूम म्हणजे कपडे पालटण्याची जागा)

झुंझुनू (राजस्थान) – येथील चिडावा भागात ‘झमझम कलेक्शन’ या कपड्यांच्या दुकानात ‘सेल्समन’ म्हणून काम करणार्या शाहरुख मनियार याला दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढतांना पकडण्यात आले. पोलिसांनी आरोपी शाहरुखला अटक केली आहे.
१. ६ जून या दिवशी एक महिला तिचा पती आणि मुले यांच्यासह या दुकानात गेली होती. निवडलेले कपडे घालून पहाण्यासाठी ती ‘ट्रायल रूम’मध्ये गेली; मात्र तिला असे आढळले की, शाहरुख मनियार खोलीच्या छतावरील एका लहान छिद्रातून भ्रमणभाषद्वारे तिचा व्हिडिओ काढत होता.
२. ती महिला बाहेर आली आणि तिने आपल्या पतीला या प्रकाराविषयी सांगितले. तिच्या पतीने शाहरुखला व्हिडिओ पहातांना रंगेहाथ पकडले. पीडित महिलेने तात्काळ पोलिसांना पाचारण केले.
३. पोलिसांनी शाहरुखचा भ्रमणभाष पडताळला असता त्यात कपड्यांच्या दुकानाला भेट देणार्या महिलांचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे सापडली.
४. पुढील अन्वेषणात असे समोर आले की, केवळ शाहरुखच नाही, तर दुकानाचा मालक आणि इतर कर्मचारीही या गुन्ह्यात सहभागी आहेत.
५. पीडितेने आरोप केला की, दुकानाचा मालक आणि त्याचे सहकारी यांनी हा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. मला माझी अपकीर्ती होण्याची भीती दाखवली आणि पोलिसांकडे प्रकरण न नेण्याच्या बदल्यात पैसेही देऊ केले; मात्र पीडिता पोलिसांना बोलावण्याच्या निर्णयावर ठाम राहिली आणि तिने पोलिसांना बोलावले.
उरुळी कांचन (पुणे) येथे मुसलमान दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग !
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण
TMC Rebellion : तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांचे बंड !