बंगालमध्ये गेल्या काही मासांपासून दिसून येणारे पालट पहातांना मनात एक वेगळीच विचार प्रक्रिया चालू झाली. सत्ता परिवर्तनानंतर तेथील वातावरण, हिंदुत्वाशी संबंधित विषयांवरील भूमिका आणि हिंदु समाजाच्या हिताच्या दृष्टीने घेतले जाणारे निर्णय यांमुळे समाजात एकप्रकारची सकारात्मक हालचाल जाणवत आहे. प्रतिदिन काही ना काही नवीन घडतांना दिसते आणि त्या प्रत्येक घटनेतून हिंदु समाजामध्ये आत्मविश्वास जागृत होत असल्याचे जाणवते.

१. समाजात जलद परिवर्तन कसे होईल ? याची आलेली प्रचीती
हे सर्व पहातांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्राच्या संदर्भात सांगितलेल्या एक अत्यंत गूढ आणि गहन संकल्पनेचा विचार मनात आला. जसा सूर्य उगवल्यावर अंधार आपोआप नाहीसा होतो, तसेच धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राचा सूर्य उगवल्यावर (हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावर) समाजातील अनेक समस्या आपोआप न्यून होतील. पूर्वी ही संकल्पना ऐकतांना मनात प्रश्न निर्माण व्हायचा की, इतक्या मोठ्या प्रमाणात परिवर्तन लवकर कसे घडू शकते ? समाजातील समस्या, भीती, अन्याय आणि अधर्म यांचे निर्मूलन एवढ्या सहजपणे कसे होईल ?
परंतु बंगालमधील परिस्थितीत होत असलेला पालट पहातांना त्या प्रश्नाचे उत्तर प्रत्यक्ष अनुभूतीतून मिळाले. जेव्हा वातावरण अनुकूल होते, समाजामध्ये हिंदुत्वाविषयी जागृती निर्माण होते आणि शासनकर्ते धर्म, संस्कृती अन् राष्ट्रहित यांचा विचार करून कार्य करतात, तेव्हा परिवर्तन वेगाने घडू लागते. लोकांच्या मनात धैर्य निर्माण होते, समाज संघटित होतो आणि योग्य दिशेने पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. हे सर्व पहातांना हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावर संपूर्ण भारतात अशाच प्रकारचे व्यापक आणि जलद परिवर्तन घडू शकते, याची प्रचीती आली.
२. आध्यात्मिक स्तरावरील आदर्श हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी सतत प्रयत्न करणे महत्त्वाचे !

तथापि ‘पूर्णपणे आध्यात्मिक स्तरावरील आदर्श हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी पुढील काही वर्षे सातत्याने प्रयत्नरत रहावे लागेल, साधना वाढवावी लागेल आणि समाजात धर्मशिक्षण देऊन सात्त्विकता दृढ करावी लागेल’, याचीही जाणीव झाली; कारण केवळ सत्ता पालट होऊन संपूर्ण परिवर्तन होत नाही, तर लोकांचे विचार अन् संस्कार यांमध्ये पालट होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
हिंदु राष्ट्र ही केवळ राजकीय संकल्पना नसून धर्माधिष्ठित, सात्त्विक आणि आदर्श समाजाची व्यवस्था आहे, याची जाणीव अधिक दृढ झाली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या विचारांची सत्यता, त्यांची दूरदृष्टी आणि समाजाच्या भविष्याचा त्यांनी केलेला सूक्ष्म विचार यांचा प्रत्यय या घटनांतून दिसून येतो. अशा दिव्य मार्गदर्शनासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेविषयी श्रद्धा दृढ करण्यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !
– श्री. कार्तिक साळुंके, मथुरा सेवाकेंद्र, मथुरा, उत्तरप्रदेश. (२६.५.२०२६)
भारतियांचे ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अलौकिकत्व !
‘मेनोपॉज’ (रजोनिवृत्ती) आणि आयुर्वेद : स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक पालटांचा समतोल !
झुरळ (कॉकरोच) पार्टीचे तेच ते अराजकतावादी ‘टेम्प्लेट’ (साचा)… !
पर्यावरण संरक्षणाला निवडणुकीचे सूत्र बनवणे आवश्यक !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !