इस्लामी अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम !

‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !

१. मुसलमानांच्या हातात भारताची रोखीची अर्थव्यवस्था

‘मी गेल्या २५ वर्षांपासून अर्थशास्त्राच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये एक जनजागृती अभियान चालवत आहे. काश्मीरमध्ये केशरची शेती होते. केशर शेतीच्या माध्यमातून तेथील सर्व अर्थव्यवस्था मुसलमानांच्या हातात केंद्रित झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सर्वाधिक उत्पादन सफरचंदाचे होते. पंजाबमध्ये अनिवासी भारतीय विदेशातून सोने घेऊन येतात आणि येथे विकतात. राजस्थानमध्ये खाण व्यवसाय विशेष प्रमाणात होतो. उत्तरप्रदेशामध्ये गुटखा आणि पान मसाला यांचे मुख्य उद्योग आहेत. महाराष्ट्रात तंबाखूची पाने आणि केळी यांचा मोठा व्यवसाय आहे. गुजरातमध्ये ‘नाफ्ता’ तेलाचा (क्रूड तेलावर प्रक्रिया केल्यानंतर मिळणारे ज्वलनशील तेल) व्यवसाय चालतो. कर्नाटकमध्ये चंदन लाकडाचा मोठा व्यवसाय आहे. केरळमध्ये नारळाचा विशेष व्यापार आहे. या सर्व  रोख रकमेच्या अर्थव्यवस्था असून त्या सर्व मुसलमानांच्या हातात केंद्रित झाल्या आहेत.

२. भारतीय चलनावर छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंदसिंह यांच्या प्रतिमा हव्यात !

आज भारतीय चलनावर छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंदसिंह यांच्या प्रतिमा असायला हव्या होत्या, तेथे मोहनदास गांधी विराजमान आहेत. त्याने आपल्याला अपेक्षित लाभ मिळत नाही. त्यामुळे जोपर्यंत भारतीय चलनावर छत्रपती शिवाजी आणि गुरु गोविंदसिंह यांच्या प्रतिमा येणार नाहीत, तोपर्यंत त्यासाठीचे प्रयत्न चालूच रहातील.


श्री. ऋषि वसिष्ठ यांचा परिचय


देहली येथील श्री. ऋषि वसिष्ठ हे ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते ‘पेटेल फायनान्शियल टेक्नॉलॉजीस’ या आस्थापनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते भाजपच्या व्यापारी सेलचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही आहेत. देश-विदेशाची आर्थिक नीती ठरवण्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. ते अर्थशास्त्राच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीची लढाई लढत आहेत.

३. देशात मुसलमान लोकसंख्या वाढण्यामागे अर्थशास्त्रीय दृष्टीकोन

स्वातंत्र्यानंतर भारतात मुसलमानांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एका गावात एक सर्वेक्षण चालू होते. तेथे एक माणूस आणि त्याच्यासह बुरखा घातलेल्या त्याच्या ३ बायका अन् आणि ८ मुले होती. त्या सर्वांची नोंद तो कर्मचारी घेतो. तो पुढच्या घरात जातो, तेथेही त्याच ३ बायका आणि तीच ८ मुले असतात. अशा प्रकारे ज्या गावाची लोकसंख्या ७०० ते ८०० असते. तेथे आता २ सहस्र ते २ सहस्र ५०० लोकसंख्या दिसते. त्याच प्रमाणात त्यांना धान्य दिले जाते. ते हे धान्य मोठ्या व्यावसायिकाला विकतात. अशा प्रकारे त्यांना काम न करता केवळ संख्या दाखवून उत्पन्न मिळते. हे सनातन धर्माच्या विरोधातील एकप्रकारचे एक षड्यंत्र आहे.

४. वैवाहिक संकेतस्थळांमधून ‘लव्ह जिहाद’ला चालना

‘वसुधैव कुटुम्बकम् । (अर्थ : संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे)’, ही भावना सनातन धर्माचा मूलमंत्र आहे. जोपर्यंत आपण १०० पावले पुढे चालणार नाही, तोपर्यंत ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांसारख्या समस्या सुटणार नाहीत. आज धर्मांतरावर अनेक संत आणि संघटना कार्य करत आहेत. ‘शादी डॉट कॉम’सह अन्य सर्व वैवाहिक संकेतस्थळांची ९८ टक्के मालकी सौदी अरेबिया आणि इतर मुसलमान देशांतून येणार्‍या अर्थसाहाय्याकडे आहे. आपली मुले-मुली या संकेतस्थळांवर त्यांची वैयक्तिक माहिती ठेवतात. या माध्यमातूनही ‘लव्ह जिहाद’ला चालना मिळते. त्यामुळे हे थांबवण्यासाठी आपल्याला स्वतंत्र संकेतस्थळ बनवावे लागेल.  या संघर्षात हिंदूंनी तन, मन आणि धन यांनी सहकार्य केले, तर हिंदु राष्ट्राची कल्पना प्रत्यक्षात साकार होईल.

– श्री. ऋषि वसिष्ठ, ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ, देहली.