छत्रपती संभाजीनगर – येथील सनातन संस्थेच्या साधिका आणि शिक्षिका सौ. कल्पना देशपांडे यांची ‘सरस्वती भुवन शिक्षण संस्थे’च्या वतीने शैक्षणिक कार्याबद्दल दिल्या जाणार्या ‘कै. शालिनी राव पारगावकर’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार प्रजासत्ताकदिनाच्या विशेष कार्यक्रमात मेळघाट येथील ज्येष्ठ समाजसेविका ‘पद्मश्री’ पुरस्कार विजेत्या डॉ. (सौ.) स्मिता कोल्हे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अधिवक्ता दिनेश, उपाध्यक्ष माजी प्राचार्य श्री. बाळकृष्ण क्षीरसागर, सचिव डॉ. श्रीरंग देशपांडे, कोषाध्यक्ष श्री. मिलिंद रानडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, तसेच पद्मश्री पुरस्कार विजेते ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने आणि त्यांनी करून घेतलेल्या प्रयत्नांमुळे हा पुरस्कार मिळाल्याविषयी सौ. कल्पना देशपांडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.