‘आमचे सरकार (समाजवादी पक्ष/इंडी आघाडी) आल्यावर हिंदूंचे गळे कापू’, अशी दिली धमकी !

सुलतानपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून क्षुल्लक वादावरून हिंदूंवर आक्रमण

सुलतानपूर (उत्तरप्रदेश) – येथे दुचाकीवरून झालेल्या वादातून धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर तलवारी आणि काठ्या यांद्वारे केलेल्या आक्रमणात जतिन अन् मोहित हे २ हिंदु तरुण घायाळ झाले. कोइरीपूर नगर येथे ही घटना घडली. येथे एका हिंदु तरुणाच्या दुचाकीने चुकून एका मुसलमान मुलाला धडक दिली. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये शिवीगाळ झाली आणि नंतर आक्रमणाची घटना घडली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हिंदूंचा आरोप आहे की, हा प्रश्‍न चर्चेनंतर सुटला असतांनाही मुसलमान संध्याकाळी मोठ्या संख्येने या भागात आले आणि त्यांनी आक्रमण केले. त्यांनी महिला आणि मुले यांनाही सोडले नाही. या आक्रमणात जैद रेन, हमीद रेन, सुफियान अन्सारी, इसरार, माजिद, सद्दाब, महंमद कैफ, साहिल, महंमद अनस, महंमद आकिब यांच्यासह ४०-५० लोकांचा सहभाग असल्याचा आरोप हिंदूंनी केला आहे. ‘आक्रमण करणार्‍या मुसलमानांनी धमकी दिली की, एकदा त्यांचे सरकार (समाजवादी पक्ष/इंडी आघाडी) सत्तेत आले की, ते हिंदूंना मारतील, त्यांचे गळे कापतील. त्यांचे केसही कापतील आणि ते मशिदीत ठेवले जातील, असे तक्रारीत म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

या धमकीविषयी समाजवादी पक्ष आणि इंडिया आघाडी यांचे नेते काही बोलतील का ? या धमकीतून लक्षात येते की, कोणते राजकीय पक्ष हिंदूंचा वंशसंहार करणार्‍यांच्या पाठीशी आहे !