४ आधुनिक वैद्यांसह ११ जणांविरोधात गुन्हा नोंद !

नाशिक – मालेगाव शहरात गर्भवती असलेल्या १६ वर्षाच्या मुलीची नोंद न करता खासगी रुग्णालयात आधुनिक वैद्यांनी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली. त्या नवजात बाळाला विकण्याचाही धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जितेंद्र डोलारे यांच्या तक्रारीवरून ४ आधुनिक वैद्यांसह ११ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डॉ. किशोर डांगे, डॉ. किशोरी डांगे, डॉ. अनुजा शेवाळे, डॉ. प्रीती जाधव अशी आधुनिक वैद्यांची नावे होती. नवसीन रफिक शेख, महंमद फईम महंमद शफिक, सार्थक प्रवीण जगताप यांच्यासह मुलीला गर्भवती करणार्या अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शस्त्रक्रियेनंतर अल्पवयीन मुलगी पसार झाली, तर नवजात बालकही सापडलेले नाही. डॉ. किशोर डांगे यांना न्यायालयाने १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील मुख्य संशयित आरोपी डॉ. किशोर डांगे हे मालेगाव सामान्य रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक म्हणून कामकाज पहात असे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस आणि आरोग्य प्रशासन यांना देण्यात आली नव्हती.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !