
जुन्नर (पुणे), ८ जून (वार्ता.) – सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी येथील आश्रमात ‘श्री रामचंद्र देव ट्रस्ट’ आणि ‘प.पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट’ यांच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त ६ आणि ७ जूनला पवमान अभिषेक अन् ब्राह्मण भोजन यांचे आयोजन करण्यात आले होते. ६ जूनला रात्री १० ते १२ पर्यंत भक्तांद्वारे प.पू. भक्तराज महाराज लिखित भजने सादर करण्यात आली. ७ जूनला सकाळी ९ ते ११ या वेळेत प.पू. भक्तराज महाराजांच्या चरणी श्री. हेमंत चेपे आणि सौ. स्मिता चेपे (नागपूर) यांच्या हस्ते पवमान अभिषेक करण्यात आला. सर्वश्री नीलेश गोडबोले, मयूर कुलकर्णी आणि किशोर अत्रे यांनी पौरोहित्य केले.

कर्णावती येथील डॉ. सुभाष जोशी यांनी दुपारी १२ ते १२.३० वाजेपर्यंत ‘यकृताचे आरोग्य आणि संतुलित आहार’ या विषयावर उपस्थित भक्तांना मार्गदर्शनपर माहिती दिली. दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भक्तांसाठी विनामूल्य ‘आरोग्य पडताळणी शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प.पू. दिलीपदादा गोखले (डोंबिवली) आणि पू. नंदूदादा कसरेकर (प.पू. भक्तराज महाराज यांचे सुपुत्र) यांची वंदनीय उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन