
तुर्भे – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे मागील ५ वर्षांत जे काम झाले आहे, त्याची चौकशी करण्याचे आदेश पणन संचालक शरद जरे यांनी दिले आहेत. यासाठी ४ सदस्यीय विशेष चौकशी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाला २ मासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज, वर्ष २०२१-२०२२ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीतील लेख्यांची पडताळणी करणे, लेखापरिक्षण विहीत मुदतीत पूर्ण होऊन त्याचा दोषदुरुस्ती अहवाल सादर न करणे, तसेच सदर लेखापरिक्षण आणि दोषदुरुस्ती सादर न झाल्याची कारणे, तसेच संबंधित दायित्व व्यवस्थापन यांची चौकशी करणे, बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ झाली नसल्याची कारणमीमांसा करून दायित्व निश्चित करणे, आयात-निर्यात कक्ष स्थापन करणे, किरकोळ विक्री व्यवसाय चालू नाही ना, अनुज्ञप्त्या आदी गोष्टी पडताळणे यांचा समावेश आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !