‘अतिथी देवो भव !’ हे ब्रीदवाक्‍य सार्थ करणारा रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम, म्‍हणजे आधुनिक काळातील गुरुकुल !

‘ऑगस्‍ट २०२४ मध्‍ये ‘आध्‍यात्मिक व्‍यक्‍तीमत्त्व विकास’ शिबिरासाठी मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात रहाण्‍याची आणि आश्रमातील दिनचर्या अनुभवण्‍याची संधी मिळाली. मी आश्रमातील सहजीवन अनुभवत असतांना माझे झालेले चिंतन लिहून देण्‍याचा प्रयत्न करत आहे. या चिंतनाचा काही भाग आपण ३ डिसेंबर या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.                    

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

(भाग ३)

या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/859854.html

श्री. अनिकेत विलास शेटे

४. सात्त्विकतेचा अखंड ऊर्जा स्रोत असलेला रामनाथी आश्रम 

४ अ. गुरुकुल पद्धतीची आठवण करून देणारा आश्रम : हा आश्रम पाहिला की, ‘पूर्वी ‘भारतातील ‘गुरुकुल’ पद्धत कशी असेल ?’, याचा अंदाज येतो. आज हिंदूंसाठी ‘मंदिरे’ ही ऊर्जेचे स्रोत आहेत, तशीच त्‍या काळात ‘गुरुकुल’ ही शक्‍ती आणि साधना यांची उपासना केंद्रे होती. त्‍याचप्रमाणे हा आश्रम साधकांसाठी सात्त्विकतेचा अखंड ऊर्जा स्रोत आहे.

४ आ. आश्रमात पुष्‍कळ सात्त्विकता आहे. येथील स्‍वच्‍छता, तसेच आश्रमात रहाणारे साधक, संत आणि सद़्‍गुरु यांच्‍या सततच्‍या साधनेमुळे येथे साक्षात् परमेश्‍वराचे अस्‍तित्‍व जाणवते.

४ इ. गुरुकृपायोगानुसार ‘अष्‍टांग साधना’ सात्त्विक वातावरणात करता येण्‍यासाठी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आश्रमाची निर्मिती करणे : ‘साधकांना कुठल्‍याही ताणाविना आणि प्रपंचातील विवंचनेविना शांतपणे साधना करता यावी’, यासाठी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आश्रमाची निर्मिती केली आहे. गुरुकृपायोगानुसार ‘अष्‍टांग साधना’ (टीप) करणारा साधक बाहेरच्‍या रज-तम वातावरणापासून दूर येथील सात्त्विक वातावरणात साधनेला येऊ शकतो. (अर्थात् आश्रमातील नियम पाळणे आणि पूर्व अनुमती घेणे आवश्‍यक ! ) ‘त्‍याची जात, त्‍याचे समाजातील स्‍थान, कौटुंबिक स्‍थिती, शिक्षण, पेशा, त्‍याच्‍याकडील पैसा’ यांपैकी व्‍यावहारिक जगातील कुठलीही आडकाठी येथे येत नाही. येथील ‘सोयी-सुविधा, महाप्रसाद’, हे सर्व अर्पणातून प्राप्‍त होत आहे. साधकांकडून त्‍यांचा अत्‍यंत कृतज्ञतेने आणि काटकसरीने वापर केला जातो.

(टीप – अष्‍टांग साधना : स्‍वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन, अहं-निर्मूलन, नामजप, भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न, सत्‍संग, सत्‍सेवा, सत्‌साठी त्‍याग अन् प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम) )

५. अनुभूती 

५ अ. प्रतिदिन केवळ ४ घंटे विश्रांती घेऊनही आश्रमातील चैतन्‍यामुळे कोणताच शारीरिक त्रास न होणे : शिबिर काळात मी निवासस्‍थानी आल्‍यावर शिबिरात झालेल्‍या सूत्रांचा अभ्‍यास करत असे. मला प्रतिदिन झोपायला रात्रीचे बारा वाजत होते, तरीही मला प्रतिदिन पहाटे ४ वाजता जाग येत असे. मी घरी असतांना माझी कधी एखादा घंटा झोप न्‍यून झाली, तरीही दुसर्‍या दिवशी मी त्‍याची भरपाई करत असे; मात्र आश्रमात माझी १० दिवस प्रतिदिन जेमतेम ४ घंटे झोप होऊनही मला पित्ताचा किंवा अन्‍य कोणताच त्रास झाला नाही. ‘हे आश्रमातील चैतन्‍यामुळे झाले’, हे माझ्‍या लक्षात आले.

६. कृतज्ञता

मी आश्रमात राहून आल्‍यामुळे माझ्‍या दृष्‍टीकोनात पालट होत आहेत आणि आश्रमजीवन स्‍वीकारण्‍यासाठी माझ्‍या मनाची अनुकूलता वाढत आहे. ‘या शिबिराच्‍या निमित्ताने गुरुदेवांनी मला अध्‍यात्‍माचे ज्ञान, तसेच आश्रमातील चैतन्‍य ग्रहण करण्‍याची संधी दिली’, त्‍याबद्दल मी त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

(समाप्‍त)

– श्री. अनिकेत विलास शेटे, पिंपरी चिंचवड, पुणे. (८.९.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक