|
बुलढाणा – येथील संवेदनशील स्थळ म्हणून ओळख असलेल्या धाड गावात ३० नोव्हेंबरच्या रात्री उशिरा दंगल झाली. क्रूरकर्मा टिपू सुलतान जयंतीनिमित्त येथे मिरवणूक काढण्यात आली. तेथे फटाके उडवण्यावरून २ गटांमध्ये वाद झाला. त्यांनी घोषणा देत एकमेकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. यात काही जण घायाळ झाले असून वाहनांची जाळपोळ करण्यात आली. येथील वातावरण तणावपूर्ण असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. धाड गावात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. येथे १५ जणांना अटक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती मिरवणूक हिंदूबहुल महाराष्ट्रात काढली जाणे हेच संतापजनक ! त्याचा उदोउदो करणार्यांना भारतातून हद्दपार करायला हवे ! |