पिंपरी (पुणे) – पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून आर्थिक अपव्यवहाराच्या (मनी लाँड्रींग) गुन्ह्यामध्ये अटक करण्याची भीती दाखवून सांगवीतील एका वृद्ध महिलेची १ कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार २१ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर या काळात घडला. या प्रकरणी संबंधित महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
त्यानुसार बंधन, एच्.डी.एफ्.सी., आयसीआयसीआय बँक (अधिकोष) खातेधारकांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेला सामाजिक माध्यमातील ‘व्हॉट्सअॅप’वरून दूरभाष करून पोलीस असल्याची बतावणी केली. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या गणवेशात वेगवेगळ्या नावाने पोलीस अधिकारी आणि मुंबई पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक केली.
संपादकीय भूमिका :वारंवार सायबर गुन्हेगार जनतेचे कोट्यवधी रुपये लुटतात, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद ! |