सज्जनगडावर (जिल्हा सातारा) दीपोत्सव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी सहस्रो ज्योती !

हलाल सक्ती निषेध मोहिमेच्या अंतर्गत ‘क्युआर कोड स्कॅन’ करून निषेध नोंदवतांना राष्ट्रप्रेमी

सातारा – सज्जनगडावर दिवाळीच्या प्रथम दिनी ‘दुर्गराज प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित पाचव्या दीपोत्सवात सहस्रो धर्मप्रेमींनी सहभाग घेत शिवरायांच्या चरणी सहस्रो ज्योती अर्पण केल्या. पहाटे ४ ते सकाळी ६ या कालावधीत झालेल्या या उत्सवात ‘मावळा प्रतिष्ठान’ने मर्दानी खेळांचे प्रदर्शन करून उत्सवाला गर्जना दिली. सातारा येथील शिवतीर्थातून धावत आणली गेलेली ज्योत या उत्सवाचे आकर्षण होती. रयत शिक्षण संस्थेचे श्री. विठ्ठल आरगडेसर यांनी धावत जाऊन ज्योत आणली. या कार्यक्रमाचा समारोप ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र यांनी झाला.

कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग ! 

या सोहळ्यात हिंदु जनजागृति समितीच्या वतीने राष्ट्रविषयक ग्रंथप्रदर्शन, क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले आणि हलालसक्ती निषेध मोहीम राबवण्यात आली. या वेळी अनेकांनी ‘क्युआर कोड स्कॅन’ करून प्रशासनाकडे निवेदनाच्या माध्यमातू निषेध नोंदवला. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे यांसह अन्य उपस्थित होते.