‘रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात नवरात्रीच्या कालावधीत प्रतिदिन यज्ञ होते. त्या यज्ञांच्या वेळी मला यज्ञातून प्रक्षेपित होणार्या धुराचा अभ्यास करता आला. यज्ञातून प्रक्षेपित होणारा धूर कधी जास्त वर न जाता भूमीला समांतर पसरायचा, कधी तो सरळ वर जायचा, कधी तो सरळ वर गतीने जायचा आणि पुष्कळ विरळ असायचा, तर कधी यज्ञातून धूर प्रक्षेपितच व्हायचा नाही, असे माझ्या लक्षात आले. ‘याचे कारण काय ?’, असा मला प्रश्न पडला. याचा संबंध मी यज्ञातून प्रक्षेपित होणार्या शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती या स्पंदनांशी जोडायचा प्रयत्न केला. तेव्हा मला पुढील सूत्रे निदर्शनास आली.
यज्ञातून प्रक्षेपित होणार्या धुरानुसार बाजूच्या सारणीप्रमाणे यज्ञातून मुख्य स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे प्रत्येक वेळीच लक्षात आले. त्यात कधीच पालट झाला नाही. त्यामुळे ‘यज्ञाच्या कालावधीत एखाद्या क्षणी यज्ञ स्पंदनांनुसार कोणत्या स्तरावर चालू आहे ?’, हे केवळ धूर बघूनच लक्षात येऊ लागले आणि तशी अनुभूतीही येत होती.’
– (सद़्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८.१०.२०२४)