१. प्रल्हादने ‘वडिलांच्या मित्राच्या मुलाच्या उपनयनाला जाण्याऐवजी प.पू. गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाला जाऊया’, असे सांगणे
‘मे २०२३ मध्ये कु. प्रल्हाद बेंगळुरू येथे होता. १३.५.२०२३ या दिवशी आम्हाला माझे यजमान श्री. चेतन यांच्या मित्राच्या मुलाच्या उपनयनाच्या कार्यक्रमाला जायचे होते. त्यानंतर मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी गोव्याला जाण्याचे नियोजन कळले. तेव्हा प्रल्हादला त्याच्या आजीने (वडिलांची आई सौ. पद्मा जनार्दन गाडी (वय ६६ वर्षे) यांनी) विचारले, ‘‘प्रल्हाद, आपण तुझ्या बाबांच्या मित्राच्या मुलाच्या मुंजीला जाऊया कि प.पू. गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाला जाऊया ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘आपण प.पू. गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवालाच जाऊया.’’
२. ब्रह्मोत्सवाच्या वेळी तीनही गुरु रथातून मार्गक्रमण करत असतांना ‘ते तिघेही स्वतःच्या हृदयात फिरत आहेत’, असे प्रल्हादला जाणवणे
ब्रह्मोत्सवाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ रथातून मार्गक्रमण करत असतांना प्रल्हादला ‘ते तिघेही त्याच्या हृदयात फिरत आहेत’, असे जाणवले. ‘हे सर्व प.पू. गुरुदेवांच्या कृपेने अनुभवता आले’, असा त्याचा भाव होता.’
-सौ. आराधना गाडी (कु. प्रल्हाद याची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.५.२०२३)