सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘आत्मज्ञान म्हणजे काय ?’, याविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सौ. प्रज्ञा चेतन परब : ‘मी पू. अनंत आठवले यांनी लिहिलेला ‘गीताज्ञानदर्शन’, हा ग्रंथ वाचला. त्यामध्ये ‘कर्मयोग’ सांगितला आहे, तसेच ‘कर्मसंन्यासयोगा’विषयीही लिहिले आहे, म्हणजे कर्माचाही संन्यास सांगितला आहे. त्याप्रमाणे ‘ज्ञानकर्मसंन्यासयोग’ही आहे. याचाच अर्थ सगळ्या गोष्टींचा संन्यास सांगितला आहे. आत्मज्ञान हेच आहे का ? आत्मज्ञान म्हणजे काय ? ते कसे होणार ?

सौ. प्रज्ञा परब

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तीयोग, हठयोग इत्यादी कितीतरी योगमार्ग आहेत. प्रत्येकाने शेवटी साध्य काय होते ? आपण प्रवास करता करता पृथ्वीतत्त्व, आपतत्त्व, तेजतत्त्व, वायुतत्त्व, आकाशतत्त्व आणि आत्मतत्त्व, येथपर्यंत जातो. आत्मा, म्हणजे ब्रह्माचाच अंश आहे. त्यानंतर आपल्याला तीच अनुभूती येते.’

– सौ. प्रज्ञा चेतन परब, फोंडा, गोवा. (११.३.२०२४)