पू. राजाराम नरुटेआबा (वय ९१ वर्षे) यांच्‍या संदर्भात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

पू. राजाराम नरुटेआबा (वय ९१ वर्षे) देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात वास्‍तव्‍याला आहेत. त्‍यांच्‍या संदर्भात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

पू. राजाराम नरुटे

१. ‘पू. नरुटेआबांना पहाताक्षणी माझे हात नमस्‍काराच्‍या मुद्रेत जोडले जातात.

२. मला प्रतिदिन त्‍यांचे दर्शन झाल्‍यावर परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्‍याची अनुभूती येते.

३. साधिकेच्‍या मनातील नकारात्‍मक विचार आणि तिच्‍यावरील आवरण पू. आबांच्‍या प्रीतीमय दृष्‍टीने दूर होणे अन् तिला हलकेपणा जाणवणे : एकदा माझ्‍या मनात नकारात्‍मक विचार येत होते. त्‍यामुळे मी पू. आबांकडे पाहिलेे नाही आणि त्‍यांना नमस्‍कार केला नाही. त्‍यानंतर मी परात्‍पर गुरु पांडे महाराज पूर्वी वास्‍तव्‍य करत असलेल्‍या खोलीत बसून नामजपादी उपाय करत होतेे. त्‍या वेळी मी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना आत्‍मनिवेदन करत होते. तेव्‍हा पू. आबांनी मला बोलावून सांगितले, ‘‘परात्‍पर गुरु पांडे महाराज यांच्‍या खोलीतील देवांसाठी फुले घेऊन जा.’’ ते माझ्‍याकडे पाहून हसले. त्‍यांच्‍या प्रीतीमय दृष्‍टीने माझ्‍यावरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण, माझ्‍या मनातील नकारात्‍मक विचार आणि मला आलेली निराशा दूर झाली. मला हलकेपणा जाणवू लागला.’

– सुश्री (कु.) मनीषा शिंदे, सनातन आश्रम, देवद. पनवेल. (१३.८.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक