सनातनच्या ५२ व्या संत पू. (सौ.) मालिनी देसाई नामजप करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

सनातनच्या संत पू. (सौ.) मालिनी सीताराम देसाई यांचा आज भाद्रपद कृष्ण अष्टमी (२५ सप्टेंबर २०२४) या दिवशी वाढदिवस आहे. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पू. मालिनी देसाई साधकांसाठी नामजप करतात. वाराणसी आश्रमात सेवा करणार्‍या श्रीमती भाग्यश्री आणेकर या रामनाथी, गोवा येथे आल्या असतांना त्यांना नामजप करतांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

पू. (सौ.) मालिनी देसाई

पू. (सौ.) मालिनी देसाई यांच्या चरणी त्यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

अ. पू. (सौ.) मालिनी देसाईकाकू नामजप करतांना मला अधून-मधून सुगंध येत होता.

आ. माझे शरीर हलके झाल्यासारखे वाटत होते.

श्रीमती भाग्यश्री आणेकर

इ. पंखा चालू नसतांनासुद्धा थंड हवेच्या झोताचा माझ्या शरिराला स्पर्श झाला. त्यामुळे मला उत्साह वाटत होता.

ई. पू.(सौ.) मालिनी देसाईकाकूंनी मुद्रा केलेल्या बोटांच्या गोलाकारात एक तेजस्वी आणि चैतन्यमय गोळा दिसून त्यातून आश्रमात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे : ‘पू.(सौ.) मालिनी देसाईकाकू मुद्रा करून नामजप करतात. त्यांची ज्ञानमुद्रा (म्हणजे अंगठ्याचे टोक तर्जनीच्या टोकाला जुळवून केलेली मुद्रा) होती. तेव्हा मला त्यांच्या त्या २ बोटांच्या मधल्या गोलाकारात एक चैतन्याचा गोळा दिसला. तो गोळा मला मंदिराच्या कळसावरील शेवटच्या लहान गोलाकार कलशाप्रमाणे दिसत होता. ‘तो चैतन्याचा गोळा अतिशय तेजोमय असून त्यातून प्रकाशाचे किरण बाहेर पडत आहेत आणि आश्रमात सर्वत्र चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.

– श्रीमती भाग्यश्री आणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६५ वर्षे), वाराणसी आश्रम  (वर्ष २०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक