Mandsaur-Miladunnabi procession : मंदसौर (मध्‍यप्रदेश) येथे ईदच्‍या मिरवणुकीच्‍या वेळी मुसलमानांकडून हनुमान मंदिरावर दगडफेक

हिंदूंकडून तात्‍काळ कारवाईच्‍या मागणीसाठी आंदोलन

मंदसौर (मध्‍यप्रदेश) – येथील नेहरू बस स्‍टँडजवळ ईदच्‍या मिरवणुकीच्‍या वेळी धर्मांध मुसलमानांनी हनुमान मंदिरावर दगडफेक केली. यात एक भाविक घायाळ झाला. याविरोधात हिंदू मोठ्या प्रमाणात रस्‍त्‍यावर उतरले आणि त्‍यांनी दगडफेक करणार्‍यांना तात्‍काळ अटक करण्‍याची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्‍हा नोंदवला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

१. हिंदू आणि मुसलमान दोन्‍ही समोरासमोर आल्‍याने येथे तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस तात्‍काळ घटनास्‍थळी पोचले. कारवाईच्‍या मागणीवर ठाम असलेल्‍या हिंदु संघटनेच्‍या सदस्‍यांची पोलिसांशी झटापटही झाली. याचा निषेध म्‍हणून रस्‍त्‍यावर हनुमान चालिसाचेही पठण करण्‍यात आले. ‘पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली नाही’, असा आरोप हिंदूंनी केला. आंदोलकांना शांत करण्‍यासाठी अनेक वरिष्‍ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्‍थळी पोचले. ‘दगडफेक करणार्‍याला लवकरच अटक करण्‍यात येईल’, असा प्रशासनाचा दावा आहे.

२. या निदर्शनाला काही स्‍थानिक व्‍यापार्‍यांचाही पाठिंबा मिळाला आणि बाजारपेठा बंद ठेवण्‍यात आल्‍या. विश्‍व हिंदु परिषदेने दगडफेकीच्‍या घटनेवर ‘हा सुनियोजित कट आहे’ असे म्‍हटले आहे.

संपादकीय भूमिका

मध्‍यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्‍या मंदिरांवर आक्रमण करण्‍याचे धाडस मुळात होतेच कसे ? पुन्‍हा असे धाडस होणार नाही, अशी धाक सरकारने निर्माण करणे आवश्‍यक आहे !