सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एका चैतन्यरूपी दृष्टीक्षेपातून अनुभवलेले भावक्षण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. दुचाकीवर बसून बाहेर जातांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी खोलीच्या खिडकीतून हात दाखवणे अन् गुरुदेवांचा दृष्टीक्षेप पडताक्षणी गाडी थांबवणे

‘मी आणि सहसाधक श्री. कुशल गुरव रामनाथी गोवा येथील सनातनच्या आश्रमातून बाहेर एका सेवेसाठी दुचाकी गाडीवरून जात होतो. गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) प्राणशक्ती अल्प असल्याने ते खोलीच्या बाहेर येत नाहीत. आम्ही दुचाकी गाडीवरून जात असतांना गुरुदेवांनी खिडकीतून (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीची खिडकी त्या मार्गाच्या दिशेने आहे.) आम्हाला हात दाखवला. आमच्यावर गुरुदेवांचा दृष्टीक्षेप पडताक्षणी आम्ही गाडी थांबवली.

२. गुरुदेवांनी चैतन्यरूपी दृष्टीचा कृपावर्षाव करणे आणि भावविभोर होऊन मन अंतर्मुख होणे

श्री. अविनाश जाधव

आज आमचे भाग्य फळाला आले होते; कारण आमच्यावर विष्णुस्वरूप गुरुदेवांची दृष्टी पडली होती. आम्ही हात जोडून गुरुदेवांकडे पहात होतो. त्याच वेळी गुरुदेवही आमच्यावर चैतन्यरूपी दृष्टीचा कृपावर्षाव करत होते. हा साधारण एक मिनिटाचा कालावधी होता. त्या वेळी माझे मन भरून आले होते. गुरुदेवांच्या स्थुलातील दर्शनाने माझ्या डोळ्यांत पाणी तरळले होते. मी भावविभोर झालो होतो. माझे मन क्षणभरात अंतर्मुख झाले होते. माझा नामजप आपोआप चालू झाला होता. आजही तो क्षण आठवला, तर डोळ्यांत आनंदाश्रू येतात.

३. गुरुदेवांनी साधक दृष्टीआड होईपर्यंत पहाणे आणि त्या भावक्षणाचे स्मरण झाल्यावर ‘जीवनात दुसरे काही नको’, असे वाटणे

आम्ही गुरुदेवांच्या दृष्टीआड होईपर्यंत ते आमच्याकडे पहात होते. त्यांचा हा कनवाळू दृष्टीक्षेप आजही माझ्या मनाला आनंद देतो. त्या भावक्षणाचे स्मरण झाल्यावर ‘जीवनात दुसरे काही नको. केवळ गुरूंचे प्रेम अन् सान्निध्यच हवे’, असे मला वाटते. या प्रसंगानंतर पुढील १५ दिवस माझा नामजप आपोआप चालू होता. ‘श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांचा एक दृष्टीक्षेप किती चैतन्य देतो !’, याची जाणीव प्रकर्षाने देवाने मला करून दिली.’

– श्री. अविनाश जाधव (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.३.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक