साधकांच्या व्याधींचे निदान करून त्यांवर नामजपादी उपाय सांगणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे, म्हणजे आधुनिक ‘अश्विनीकुमार’ !

‘देवद (पनवेल) येथील आश्रमातील सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे, म्हणजे व्याधीचे अचूक निदान करून त्यावर अचूक नामजपादी उपाय सांगणारे आधुनिक ‘अश्विनीकुमार (देवतांचे वैद्य)’ आहेत. सद्गुरु राजेंद्रदादा प्राणशक्तीवहन उपचारपद्धतीद्वारे साधकांच्या व्याधीचे अचूक निदान करतात आणि साधकांना नामजप शोधून देऊन तो नामजप करायला सांगतात. त्यांनी सांगितलेला नामजप केल्यावर साधकांचे त्रास दूर होतात.

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

१. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे नामजप केल्यावर थंडीचा त्रास दूर होणे

पावसाळ्यात आणि थंडीत माझे अंग गार पडते अन् मला स्वेटर, स्कार्फ अन् पायांत मोजे घालावे लागतात. अशा वेळी मला खोलीतच रहावे लागते. एकदा मी थंडीने फार त्रस्त झाले होते. तेव्हा सद्गुरु दादांनी मला प्राणशक्तीवहन उपचारपद्धतीद्वारे नामजप शोधून दिला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी काही घंटे नामजप केला आणि माझी थंडी गेली अन् मला स्वेटरही घालावा लागला नाही.

श्रीमती प्रज्ञा कोरगावकर

२. सद्गुरु राजेंद्रदादांच्या केवळ अस्तित्वाने साधिकेची पायदुखी थांबणे

अनेक वेळा सद्गुरु राजेंद्रदादांच्या अस्तित्वामुळेही साधकांचे त्रास दूर होतात. एक दिवस मी जिना चढत होते. मला फारच त्रास होत होता. मला जिना चढायला जमत नव्हते. सद्गुरु दादांनी मला विचारले, ‘‘काय झाले ?’’ त्यावर मी म्हणाले, ‘‘माझे पाय दुखतात.’’ नंतर मी खोलीत गेले, तर आश्चर्य म्हणजे माझे पाय दुखायचे थांबले होते !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने देवद आश्रमात त्यांनी त्यांच्यासारखेच घडवलेले सदगुरु राजेंद्रदादा आम्हाला दिले आहेत’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्रीमती प्रज्ञा सखाराम कोरगावकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.(१५.८.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक