ED Raids DMK Leader : द्रमुकच्या माजी नेत्यासह सहकार्‍यांवर अंमलबजावणी संचालनालयाची धाड : ५५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त

(द्रविड म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ))

द्रमुकचे माजी नेते जाफर सादिक

नवी देहली – द्रमुकचे माजी नेते जाफर सादिक आणि त्यांचे सहकारी यांच्या मालमत्तेवर अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) धाड घालून ५५ कोटी ३० लाख रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त केली. यात आलिशान बंगला, हॉटेल, महागड्या गाड्या आदींचा समावेश आहे.

अमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि सीमा शुल्क विभाग यांच्या अन्वेषणाच्या आधारे ‘ईडी’ने तमिळनाडूतील १५ ठिकाणी धाडी घातल्या. जाफर सादिक, त्याचा भाऊ महंमद सलीम आणि अन्य लोक ‘स्यूडोएफेड्रीन’ आणि अन्य नशेचे पदार्थ निर्यात अन् तस्करी करण्यात सहभागी होते. जाफर सादिक याला ‘ईडी’ने २६ जून २०२४ ला अटक केली होती. त्यानंतर १२ ऑगस्टला त्याचा भाऊ महंमद सलीम यालाही ‘ईडी’ने अटक केली.

संपादकीय भूमिका

हिंदु धर्म नष्ट करण्याची विधाने करणार्‍या पक्षाच्या नेत्यांची खरी स्थिती लक्षात घ्या !