‘महर्षींनी सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सांगितले, ‘या वर्षी गुरुदेवांचा जन्मोत्सव २७ ते ३०.५.२०२४ या कालावधीत साजरा करावा. २७.५.२०२४ या दिवशी साधकांनी आपापल्या घरी वैयक्तिकरित्या गुरुदेवांची मानसपूजा करून त्यांचा जन्मोत्सव साजरा करावा. गुरुदेवांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या उपस्थितीत २८ ते ३०.५.२०२४ या ३ दिवसांच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात नवचंडी याग करावा.’ त्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. २७.५.२०२४ या दिवशी आलेल्या अनुभूती
१ अ. सनातनच्या तिन्ही गुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) जयंत आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या) चरणी समर्पित होण्यासाठी घराच्या आगाशीतील जास्वंदीच्या रोपाला ३ गुलाबी रंगाची फुले येणे : ‘२७.५.२०२४ या दिवशी आमच्या घराच्या आगाशीतील जास्वंदीच्या रोपाला ३ गुलाबी रंगाची फुले आली होती. जणू काही त्यांनाही सनातनच्या तिन्ही गुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) जयंत आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या) चरणी समर्पित व्हायचे होते.
१ आ. आश्रमातील पवित्र भूमीचा स्पर्श होऊन तेथील चैतन्य अनुभवता येणे : त्याच सायंकाळी आम्ही उभयता एका सेवेनिमित्त रामनाथी आश्रमात गेलो होतो. त्यामुळे आम्हा उभयतांना स्थुलातूनही आश्रमातील पवित्र भूमीचा स्पर्श होऊन तेथील चैतन्य अनुभवता आले.
१ इ. ध्यानमंदिरातील दुर्गादेवीच्या मूर्तीतील सिंह सजीव वाटणे : आम्ही दोघे ध्यानमंदिरात नामजपाला बसलो होतो. तेव्हा दुर्गादेवीचे वाहन असलेल्या सिंहाकडे आमचे लक्ष वेधले जात होते आणि आम्हाला तो सजीव वाटत होता.
१ इ. ‘आश्रमात जन्मोत्सवानिमित्त लावलेल्या पणत्यांच्या प्रकाशामुळे तेथे एक वेगळेच दैवी वातावरण निर्माण झाले होते’, असे आम्हाला जाणवले.
२. २९.५.२०२४ (नवचंडी यागाच्या दुसर्या दिवशी) या दिवशी जाणवलेली सूत्रे
२ अ. नवचंडी यागाच्या दुसर्या दिवशी काही साधकांना चित्रीकरणाच्या संबंधित सेवेसाठी रामनाथी आश्रमात बोलावले होते. त्यामध्ये आम्हाला सहभागी होण्याची संधी देऊन श्री गुरूंनी आमच्यावर कृपाच केली.
२ आ. आश्रमातील सर्व संतांचे अस्तित्व आणि साधकांचा सहवास यांमुळे ‘चैतन्याच्या महासागरातच डुंबत आहोत’, असे आम्हाला वाटत होते.
३. ३०.५.२०२४ या दिवशी (नवचंडीयागाच्या तिसर्या दिवशी) जाणवलेली सूत्रे
३ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोघी देवीसमान भासणे : यागाच्या तिसर्या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या यज्ञस्थळी उपस्थित होत्या. त्यांना पाहिल्यावर त्या आम्हाला देवीसमान भासल्या.
३ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यात देवीचे सगुण तत्त्व कार्यरत असून ते साधकांना चैतन्य प्रदान करत आहेत आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या निर्गुण स्तरावर कार्यरत असून सूक्ष्म शक्तींशी लढत आहेत’, असे जाणवणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या दोघींची स्थिती वेगवेगळी होती. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यात देवीचे सगुण तत्त्व कार्यरत असून ते साधकांना चैतन्य प्रदान करत आहेत’ आणि ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या शांत आणि ध्यानस्थ आहेत. त्या अधिक निर्गुण स्तरावर कार्यरत असून सूक्ष्म शक्तींशी लढत आहेत’, असे आम्हाला जाणवले.
३ इ. पूजास्थळी असलेली सिंहावर आरूढ दुर्गादेवीची मूर्ती आम्हाला सजीव वाटत होती. यागाच्या वेळी मूर्तीच्या रंगात पालट जाणवून ती आम्हाला सोनेरी भासत होती.’
– श्री. नितीन सहकारी (वय ६४ वर्षे) आणि सौ. श्रुती सहकारी फोंडा, गोवा. (१९.६.२०२४)
|