Bangladeshi Govt Surrenders ‘Hifazat-e-Islam’ : महंमद युनूस यांनी कट्टरतावादी संघटना ‘हिफाजत-ए-इस्‍लाम’च्‍या नेत्‍यांची घेतली भेट

बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारच्‍या प्रमुखांची कट्टरतावाद्यांसमोर शरणागती

ढाका – शेख हसीना सरकार पाडल्‍यानंतर महंमद युनूस यांच्‍या नेतृत्‍वाखाली स्‍थापन झालेल्‍या बांगलादेशातील अंतरिम सरकारने कट्टरतावाद्यांसमोर पूर्णपणे शरणागती पत्‍करली आहे. ३१ ऑगस्‍ट २०२४ या दिवशी महंमद युनूस यांनी ढाका येथे कट्टरतावादी संघटना ‘हिफाजत-ए-इस्‍लाम’चा नेता मामुनुल हक आणि गटाचे इतर सदस्‍य यांच्‍यासोबत बैठक घेतली. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करणे आणि वेळेवर निवडणुका घेणे यांवर चर्चा करण्‍यात आली.

‘हिफाजत-ए-इस्‍लाम’चा भारतद्वेष !

महंमद युनूस आणि मामुनुल हक यांच्‍यातील भेट हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. ‘हिफाजत-ए-इस्‍लाम’चे नेते प्रक्षोभक विधाने करण्‍यासाठी आणि भारतविरोधी भूमिका घेण्‍यासाठी कुप्रसिद्ध आहेत. शेख हसीना यांच्‍या सरकारच्‍या काळात मामुनुल हक याला हिंसाचार भडकावण्‍यासह विविध आरोपांखाली अटक करण्‍यात आली होती. बांगलादेशात स्‍थापन झालेल्‍या अंतरिम सरकारने मामुनुल हक आणि इतर जिहादी नेते यांची सुटका केली आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील जिहादी, कट्टरतावादी, धर्मांध आणि आतंकवादी यांच्‍यामुळे भविष्‍यात पाकिस्‍तानप्रमाणे तेथेही अराजक माजल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !