कोपरखैरणे येथे हिंदु संमेलनाचे आयोजन


नवी मुंबई
– विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरखैरणे येथे १ सप्टेंबर या दिवशी हिंदु संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्व हिंदु परिषदेच्या षष्ठ्यब्दपूर्ती निमित्ताने हे संमेलन घेण्यात येणार आहे. सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत कोपरखैरणे सेक्टर १९, गणोबा गणेश मंदिर येथे हे संमेलन होणार आहे, अशी माहिती बजरंग दलाचे सह संयोजक तेजस पाटील यांनी दिली.

या वेळी कोकण प्रांत बजरंग दलाचे सहसंयोजक गौतम रावरिया हे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात हिंदूंच्या विविध समस्या, तसेच हिंदूंच्या हिताच्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. या संमेलनाला महंत, महामंडलेश्वर, इस्कॉन मंदिर खारघरचे प्रमुख पुजारी उपस्थित रहाणार आहेत. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.