‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. एका बालसाधकाने नामजप लिहिलेल्या वहीला चंदन आणि अष्टगंध यांचा सुगंध येणे अन् त्याच्याकडे पाहिल्यावर शांत आणि स्थिर वाटणे
कु. चैतन्य साटम (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ५८ टक्के, वय ७ वर्षे) याने एका वहीत भावपूर्णरित्या नामजप लिहिला होता. मी ती वही हातात घेतल्यावर मला चंदन आणि अष्टगंध यांचा सुगंध आला. मी त्याच्या वहीला स्पर्श केल्यावर मला गुरुमाऊलींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) हातालाच स्पर्श केल्यासारखे वाटले. मला कोमल आणि मुलायम स्पर्शाची जाणीव झाली. मला चैतन्य शांत आणि स्थिर वाटला.
२. पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी यांनी साधकांच्या दिशेने ३ वेळा हात फिरवल्यावर साधिकेला ‘तिच्या हाताच्या कोपरापासून बोटांपर्यंत सातत्याने थंड वार्याची झुळूक येत आहे’, असे जाणवणे
गुरुदेवांनी साधकांना डोळे बंद करून आणि हात वर करून बोटे आकाशाच्या दिशेने करायला सांगितली. त्या वेळी पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी (सनातनच्या ९० व्या संत, वय ७५ वर्षे) यांनी साधकांच्या दिशेने ३ वेळा हात फिरवला. पू. परांजपेआजी हा प्रयोग करत असतांना ‘माझ्या हाताच्या कोपरापासून बोटांपर्यंत सातत्याने थंड वार्याची झुळूक येत आहे’, असे मला जाणवले.’
– सौ. लक्ष्मी गायकवाड, पुणे
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |