भारताचार्य पू. सु.ग. शेवडे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे

१. शिकायला मिळालेली सूत्रे

‘काही दिवसांपूर्वी मी आणि काही साधक पू. भारताचार्य सु. ग. शेवडे (पू. आबा) यांच्या खोलीत त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. तिथे त्यांना विविध कलांच्या संदर्भातील सेवांविषयी थोडक्यात माहिती सांगितली. तेव्हा त्यांच्याकडून मला पुढे दिलेली सूत्रे शिकायला मिळाली.

अ. माझी पू. आबांशी (पू. शेवडेगुरुजी यांच्याशी) पहिली भेट असूनही त्यांना पाहून माझी सतत भावजागृती होत होती.

आ. पू. आबांनी साधकांशी सहजतेने आणि प्रेमाने संवाद साधला.

इ. ‘त्यांच्याकडे असलेले अफाट ज्ञान, त्यांनी केलेला त्याग, घेतलेले कष्ट आणि त्यांची भगवंताप्रती असलेली श्रद्धा अन् भाव इत्यादी अनेक गुणांमुळे ते संत असावेत’, असे मला वाटले.

ई. त्यांच्या भेटीनंतर काही दिवस मला त्यांची आठवण येत असे आणि आनंद जाणवत असे.

२. पूर्वसूचना मिळणे

९.६.२०२४ च्या रात्री मला ११.६.२०२४ या दिवशी होणार्‍या पू. आबांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचा निरोप मिळाला. त्या क्षणापासून माझ्या मनात सतत ‘पू. आबांचा संतसन्मान सोहळा असेल’, असे विचार येऊ लागले. तेव्हा मला एक वेगळाच आनंद आणि उत्साह जाणवत होता.

३. संतसन्मान सोहळ्याच्या वेळी जाणवलेली सूत्रे 

अ. ‘पू. आबांच्या संतसन्मान सोहळ्याला सूक्ष्मातून अनेक संत उपस्थित आहेत आणि सोहळा कोणत्या तरी उच्च लोकात चालू आहे’, असे मला वाटले.

आ. ‘वातावरणात पुष्कळ चैतन्य आणि आनंदाच्या लहरी असून त्यांचा लाभ उपस्थित सर्वांना मिळत आहे’, असे मला वाटले.

इ.  पू. आबांचे कार्य हे स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवर चालू आहे.

ई. पू. आबांकडे उच्च पदवी, ज्ञानाचे भांडार इत्यादी असूनही ते परात्पर गुरुदेवांविषयी सतत कृतज्ञता व्यक्त करत होते. यावरून ‘त्यांचा परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आहे’, असे जाणवले.

उ. परात्पर गुरुदेवांनी मनोगत व्यक्त करून भारताचार्य सु. ग. शेवडे यांचे संतपद घोषित केले. तेव्हा पू. आबा स्थिर आणि कृतज्ञतावस्थेत होते.

हे भगवंता, तुझ्या कृपेमुळे मला पू. सु.ग. शेवडे यांचा सहवास आणि मार्गदर्शन मिळाले. त्याबद्दल मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.’

– कु. साधना सावंत, फोंडा, गोवा  (१२.६.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक