साधिकेने अनुभवलेले प्रार्थनेचे महत्त्व !

प्रार्थना

१. प्रार्थना केल्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन होणे

कु. प्रतीक्षा हडकर

एकदा मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची पुष्कळ आठवण येत होती. ‘ते मला कधी दर्शन देतील ?’, असे मला वाटत होते. त्यानंतर माझ्याकडून प्रार्थना झाली. प्रार्थना करून झाल्यावर मी डोळे उघडून पाहिले, तर प.पू. डॉक्टर पूर्ण दर्शन होईल, अशा प्रकारे उभे असलेले दुरून दिसले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘देवाने करवून घेतलेली प्रार्थना गुरुमाऊलीच्या चरणांजवळ पोचत आहे. प्रार्थनेने देवसुद्धा भेटतो.’ त्या वेळी ‘प्रार्थनेमध्ये किती अफाट शक्ती आहे !’ याची मला जाणीव झाली.

२. प्रार्थनेविषयी झालेले चिंतन

२ अ. प्रार्थना देवापर्यंत पोचते कि नाही, असा विचार करण्यापेक्षा प्रार्थना करत रहावे ! : पूर्वी मी प्रार्थना केली की, ‘ती देवापर्यंत पोचत नाही’, असे मला वाटायचे. त्यानंतर या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात एका साधकाने हे सूत्र (माझ्या मनात आलेला विचार) त्यांना विचारले. त्या वेळी प.पू. डॉक्टरांनी त्याला उत्तर दिले, ‘‘प्रार्थना देवापर्यंत पोचते कि नाही’, असा विचार करण्यापेक्षा प्रार्थना करत रहायचे. फळाची अपेक्षा करायची नाही.’’ तेव्हापासून माझ्या मनातील ‘मी करत असलेली प्रार्थना देवापर्यंत पोचते का ?’ हा विचार न्यून झाला.

२ आ. अंतर्मनापासून केलेली प्रार्थना परमात्म्यापर्यंत पोचत असते.

२ इ. प्रार्थनेने देवाला शोधावे; कारण प्रार्थनेत जणू लोहचुंबकाप्रमाणे शक्ती असल्याने प्रार्थनेने देवाचे दर्शन होत असते.

मला गुरुकृपेमुळेच हे शिकायला मिळाले. त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करते.’

– सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.