मां श्री चामुंडामातेच्यामूर्तीसमोर २ बुरखाधारी महिलांनी फेकले मांस !

  • पैगंबरापूर सुखवासीलाल (उत्तरप्रदेश) गावातील घटना !

  • हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !

मां श्री चामुंडामातेचे मंदिर

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) : जिल्ह्यातील पैगंबरापूर सुखवासीलाल नावाच्या गावात मां श्री चामुंडामातेचे मंदिर असून ते परिसरातील सर्व हिंदूंचे मुख्य श्रद्धास्थान आहे. या मंदिरात दोन बुरखाधारी महिला आणि एक अज्ञात पुरुष यांनी मांस फेकल्याची घटना समोर आली आहे. संतप्त ग्रामस्थांनी ही घटना धार्मिक भावना दुखावणारी असल्याचे सांगत या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. या वेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास चालू केला आहे.

गावातील श्री चामुंडामाता मंदिरात १६ ऑगस्टच्या दिवशी श्री चामुंडामातेच्या मूर्तीसमोरच मांसाचे तुकडे आढळून आले. हे मांस कोंबडीचे असल्याचे सांगितले जात आहे. याआधीही याच मंदिरातून घंटा चोरीला गेल्या होत्या आणि मूर्तीही फोडल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेनंतर मंदिराचा व्हिडिओही सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. या व्हिडिओमध्ये मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मांसाच्या तुकड्यांसह भूमीवर रक्त उडाल्याचेही दिसत आहे.

संपादकीय भूमिका

  • धर्मांध मुसलमान पुरुषांच्या बरोबरीने हिंदुद्वेषी कृत्य करणार्‍या धर्मांध मुसलमान महिला ! बुरख्याचा अशा प्रकारे वापर होत असल्याने बुरख्यावर बंदीच घातली पाहिजे !
  • उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे असे हिंदुद्वेषी कृत्य करण्याचे धाडस कसे होते ?