|
कोलकाता (बंगाल) – राजधानी कोलकातापासून १४ किमी अंतरावर असलेल्या निमता पाईकपारा या गावात तब्बल २०० रोहिंग्या मुसलमानांनी एका हिंदु कुटुंबावर आक्रमण केले. रोहिंग्यांच्या जमावाने हिंदूच्या घरात घुसून देवतांच्या मूर्ती फोडल्या, तसेच हिंदु कुटुंबाला अमानुष मारहाण केली. भाजपने या घटनेचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओत पीडित हिंदु महिला घडलेल्या घटनेचे कथन करतांना दिसत आहे. या आक्रमणामागील कारण असे आहे की, एका मुसलमानाने विश्वजीत मंडल नावाच्या एका हिंदूला ‘सलाम वालेकुम’ (तुम्हाला शांती मिळो), असे म्हणत अभिवादन केले, तेव्हा विश्वजीत यांनी त्याला ‘जय श्रीराम’, असे म्हणत प्रतिसाद दिला. याचा राग मनात धरून मुसलमानांनी विश्वजीत यांच्या घरावर आक्रमण केले.
Hindu family attacked by 200 Rohingyas near Kolkata; Deities’ vigrahas vandalized
🛑A Mu$l!m who greeted a Hindu with “Salam Walekum” was angered upon the Hindu replying with “Jai Shri Ram”, which led to the incident.
🛑A Hindu woman was molested.
👉Bengal is rapidly moving… pic.twitter.com/U4W8zxlfCO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 15, 2024
कुटुंबावरील हे आक्रमण रात्री केल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी विश्वजीत मंडल यांची पत्नी आक्रमणकर्त्यांच्या हाता-पाया पडू लागली, तेव्हा त्यांनी तिला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला आणि ‘लवकरात लवकर घर सोडून दुसरीकडे निघून जा’, अशा शब्दांत धमकावले.
संपादकीय भूमिका
|