विदेशात जाणार्‍या बांगलादेशी नागरिकाला अटक

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – पुणे येथून पारपत्र मिळवून सौदी अरेबियाला जाणार्‍या बांगलादेशी नागरिकाला इमिग्रेशन (स्थलांतर) विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. आरोपी १३ वर्षांपूर्वी बांगलादेशातून अवैधरित्या भारतात आला होता. त्यानंतर तो २ वेळा भारतीय पारपत्रावर सौदी अरेबियाला गेला होता. अखेर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या उस्मान किरमत सिद्धीकी उपाख्य महंमद ओसमान किरमतअली बिस्वास याला पकडण्यात आले. बनावट कागदपत्र आणि पारपत्र प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपीविरोधात सहार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

त्याचा जन्म कोलकाताचा असून त्याने पारपत्र पुण्यात काढल्याचे निदर्शनास आले. त्याच्या बोलीभाषेवरून तो बांगलादेशी नागरिक असल्याचा इमिग्रेशन अधिकार्‍यांना संशय आला होता. त्यामुळे अधिकार्‍यांनी त्याला चौकशीसाठी कह्यात घेतल्यावर बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली त्याने दिली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. तो बांगलादेशात नियमित ये-जा करत असल्याचा संशय आहे.

संपादकीय भूमिका

  • घुसखोरांचे नंदनवन बनलेल्या भारतात उद्या अराजक माजले, तर त्यात बांगलादेशींची भूमिका मोठी ठरल्यास आश्चर्य वाटू नये !
  • बांगलादेशी घुसखोरांना निवडून निवडून देशातून हाकलून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलायला हवीत.
  • एन्.आर्.सी. म्हणजे राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रियेनुसार कायदा. सर्व भारतीय नागरिकांची नोंदणी करण्याचा कायदा का आवश्यक आहे ? ते यावरून लक्षात येईल !