बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहाराचे मुंबईतील वाहतूक पोलीस हवालदार सय्यद यांच्याकडून समर्थन !

भाजपच्या नेत्या अक्षता तेंडुलकर यांची पोलिसांत तक्रार !

भाजपच्या नेत्या अक्षता तेंडुलकर

मुंबई – कर्तव्यावर असतांना वाहतूक पोलीस सय्यद यांनी ‘मणीपूर येथे एवढे जण मेले, तिथे तुमचे पंतप्रधान मोदी का गेले नाहीत ? बांगलादेशात १५-२० हिंदू मेले तर काय झाले ?’ असे हिंदुद्वेषी आणि उद्दाम वक्तव्य केले. याविषयी भाजपच्या दादर प्रदेश सरचिटणीस अक्षता तेंडुलकर यांनी ११ ऑगस्ट या दिवशी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

दादर पश्चिम येथील सेनापती बापट रस्त्यावर लावण्यात आलेल्या वाहनांमुळे नागरिकांना अडथळा होत असल्याविषयी अक्षता तेंडुलकर यांनी कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस सय्यद यांच्याकडे तक्रार केली. ‘अवैधरित्या धंदा करणार्‍या बांगलादेशी मुसलमान घुसखोरांमुळे येथे वाहतूककोंडी होत आहे. येथेही बांगलादेशाप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होईल’, असे अक्षता तेंडुलकर यांनी म्हटले असता सय्यद यांनी त्यांच्याशी हुज्जत घालत वरील आक्षेपार्ह वक्तव्य केले.

या वेळी तेथे आजूबाजूला असलेल्या मुसलमानांनी एकत्र येऊन अक्षता तेंडुलकर यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सय्यद आणि त्यांना साथ देणारे अन्य मुसलमान यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अक्षता तेंडुलकर यांनी तक्रारीत केली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे अक्षता तेंडुलकर यांनी म्हटले.

संपादकीय भूमिका :

  • जेथे अवैधरित्या घुसखोर बांगलादेशी अवैध धंदे करतात, तिथेच मुसलमान वाहतूक पोलिसाची नेमणूक असल्याने त्यांच्यामुळे होणारी वाहतूककोंडी तो रोखत नाही ? असेच या प्रसंगावरून कुणाला वाटले, तर चूक ते काय ?
  • बांगलादेशी घुसखोरांविषयी बोलल्यावर भांडण करणार्‍या धर्मांध वाहतूक पोलिसाची निष्ठा भारताशी आहे कि शत्रूराष्ट्राशी हे पोलीस प्रशासन पडताळून पहाणार का ?
  • जरा काही खुट्ट झाले की, एकत्र येऊन भांडण करून अराजकता निर्माण करणार्‍या धर्मांधांचे हे धैर्य चेपले जात नाही म्हणूनच त्यांचे फावले आहे !