‘१२.६.२०२४ या दिवशी प.पू. डॉक्टर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि साधक यांनी पू. दातेआजी यांच्यासाठी उपाय, प्रयोग, न्यास आणि नामजप केले. त्याची माहिती पुढील सारणीत दिली आहे.
टीप १ : अ. पू. आजींना ताप नसतांनाही उष्णता जाणवली.
आ. ‘पू. आजींच्या डोक्याच्या किती अंतरावर उष्णता जाणवते ?’, हे बघायला सांगितले. तेव्हा मला पू. आजींच्या डोक्यापासून अर्ध्या फुटाच्या अंतरावर उष्णता जाणवली. तसेच डाव्या कानापासून २ फूट अंतरावर, डाव्या पायाच्या बोटांच्या दिशेने साधारण एक ते सव्वा फूट अंतरावर उष्णता जाणवली.
टीप २ – सौ. ज्योती दाते यांनी हाताचा तळवा पू. आजींचे पोट, छाती आणि पोटाच्या मधल्या उंचवट्यावर धरला. तेथून मग छातीच्या मध्याकडे नेला. मग हळूहळू परत उंचवट्यावर आणला. तेथून मग गळ्याच्या इथे, तिथून कानाच्या इथे आणि मग अजून वर डोक्यावर फिरवला. परत हाताचा तळवा गळ्याकडून छातीकडे, तिथून पोटाकडे आणि परत कानाकडे असा हात फिरवला.
अन्य सूत्रे
१. मला ‘पू. आजींच्या भ्रूमध्याच्या ठिकाणी गुलाबी रंग झाला आहे’, असे जाणवले.
२. प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘सनातन म्हणजे नित्य नूतन ! तसे पू. आजींकडून प्रतिदिन नवीन शिकायला मिळत आहे.’
– सौ. ज्योती दाते (पू. आजींची सून, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे), पुणे. (१३.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपाद |
प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीचा लाभ करून घ्या !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पुढे येणार्या घोर आपत्काळात वैद्यकीय उपचार मिळणे दुरापास्त होणार आहे’, हे ओळखून मानवाला व्याधींवर मात करता येण्यासाठी प्राणशक्तीवहनातील अडथळे शोधणे आणि हाताच्या बोटांच्या मुद्रा अन् नामजप करणे, हे शिकवणारी उपायपद्धत शोधली आहे. या उपायपद्धतीद्वारे व्याधीग्रस्त व्यक्ती कुणाचेही साहाय्य न घेता स्वतःची व्याधी दूर करण्याचा प्रयत्न करू शकते किंवा उन्नत साधकही अन्य आजारी व्यक्तीसाठी या उपायपद्धतीद्वारे त्याची व्याधी दूर होण्यासाठी प्रयत्न करू शकतात.
सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दाते (वय ९१ वर्षे) या सध्या गंभीर आजारी (बेशुद्ध) असून त्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहात आहेत. त्यांच्या या गंभीर आजारपणात आधुनिक वैद्य त्यांच्यावर औषधोपचार करत आहेत. याचसमवेत स्वतःची प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय केले, तसेच अन्य साधकांना नामजपादी उपाय सांगून त्यांच्याकडून उपाय आणि काही प्रयोगही करवून घेतले. उपायपद्धतीमुळे काय फरक जाणवतो ? याचाही अभ्यास केला. या प्रयोगातून आध्यात्मिक स्तरावर होणारा लाभ साधक आणि समाज यांना शिकता येईल, तसेच या उपचारपद्धतीचे महत्त्वही यातून अधोरेखित होईल, या दृष्टीने ही लेखमाला येथे प्रसिद्ध करत आहोत.
– संपादक