Puri Shankaracharya Reaction : हिंदू सुरक्षित नसतील, तर मुसलमान शिल्लक रहाणार नाहीत ! – पुरीचे शंकराचार्य स्‍वामी निश्‍चलानंद सरस्‍वती

पुरीचे शंकराचार्य स्‍वामी निश्‍चलानंद सरस्‍वती

पुरी – बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या आक्रमणाचे सूत्र भारतातही तापत आहे. अनेक हिंदु संघटनांनी याविषयी आवाज उठवला आहे. आता या प्रकरणी पुरीचे पीठाधीश्‍वर शंकराचार्य स्‍वामी निश्‍चलानंद सरस्‍वती यांनीही प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली आहे. स्‍वामी निश्‍चलानंद सरस्‍वती यांनी एका व्‍हिडिओच्‍या माध्‍यमातून याविषयी म्‍हटले आहे की, शांतता प्रस्‍थापित केली; म्‍हणजे ‘आम्‍ही हिंदूंवर उपकार केले’, असे मुसलमानांनी समजू नये. मुसलमानांनी त्‍यांचे अस्‍तित्‍व सुरक्षित ठेवण्‍यासाठी हिंदूंचे रक्षण करावे. हिंदूंना लक्ष्य करून आक्रमण केले, तर १००-२०० हिंदू मारले जाण्‍याची शक्‍यता आहे; पण मुसलमान शिल्लक रहाणार नाहीत.

सनातनी हिंदूच जगात शांतता प्रस्‍थापित करू शकतात !

शंकराचार्यांचे शिष्‍य आणि शिवगंगा आश्रम, झुंसीचे महंत प्रफुल्ल चैतन्‍य ब्रह्मचारी यांनी शंकराचार्यांचा हा व्‍हिडिओ संदेश सामाजिक माध्‍यमांत प्रसारित केला आहे. या व्‍हिडिओमध्‍ये शंकराचार्य म्‍हणतात की, जिथे हिंदू नाहीत, तिथे मुसलमान आपापसांत लढून मरत आहेत. सनातनी हिंदूच जगात शांतता प्रस्‍थापित करू शकतात. त्‍यामुळे हिंदूंचे संरक्षण करणे, हे प्रत्‍येकाचे दायित्‍व आहे.

शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनीही हिंदूंवरील आक्रमणाचा केला होता निषेध !

यापूर्वी बांगलादेशातील परिस्‍थितीवर प्रतिक्रिया व्‍यक्‍त करतांना ज्‍योतिर्मठ पिठाचे शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी हिंदूंवरील आक्रमणाचा निषेध केला होता. ते म्‍हणाले होते की, शेजारील बांगलादेशात राजकीय गोंधळ चालू आहे. बांगलादेशात ८ टक्‍क्‍यांहून अल्‍प हिंदू रहातात. त्‍यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. तेथे सत्तास्‍थानी असलेल्‍यांनी हिंदु जनतेला कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी दक्षता घ्‍यावी.