यांगून (म्यानमार) – म्यानमारमध्ये गेल्या काही वर्षांपासून अराजक निर्माण झाले आहे. तेथील रोहिंग्या मुसलमानांनी यापूर्वीच देश सोडून बांगलादेशात पलायन केले आहे. सध्या बांगलादेशात ९ लाख रोहिंग्या शरणार्थी मुसलमान आहेत.
Correction
At least 200 Rohingyas killed….— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 11, 2024
आता पुन्हा मोठ्या संख्येने रोहिंग्या पळून बांगलादेशाच्या सीमेवर जात असतांना त्यांच्यावर ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आले. यात २०० हून अधिक रोहिंग्यांचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात ५ ऑगस्टला हे आक्रमण झाल्याचे आता समोर आले आहे. या प्रकरणी येथील मिलिशिया गट आणि म्यानमार सैन्य यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.