हिंदूंच्या नाशासाठी ‘सेक्युलर’ (निधर्मी) शब्द राज्यघटनेत घुसडला !

स्वातंत्र्यानंतर हिंदुद्वेष्ट्या नेहरूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्याची न्याय्य मागणी धुडकावून हिंदूंना आणि राज्यघटनेतील हिंदु संस्कृतीची महानता दर्शवणारी चित्रे काढून तिला ‘निधर्मी’ बनवण्याचा कसा प्रयत्न केला ? ते मागील लेखात पाहिले. या लेखात इंदिरा गांधींनी घोषित केलेली ‘आणीबाणी’ आणि त्या वेळी राज्यघटनेत घुसडलेला ‘निधर्मी’ शब्द यांविषयी पाहू. पुढच्या काळात भारतातील हा निधर्मीपणा या शब्दाचा अर्थ ‘मुसलमानांचे लांगूलचालन आणि हिंदूंवर घोर अन्याय’, असाच झाला.

१. इंदिरा गांधींनी घोषित केलेली आणीबाणी !

वर्ष १९७५ मध्ये इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या. त्या वेळी त्यांनी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवतांना गैरमार्गाचा अवलंब केला होता. त्याविरुद्ध अलाहाबाद उच्च न्यायालयात राजनारायण यांनी एक याचिका प्रविष्ट केली होती. या दाव्याचा निर्णय राजनारायण यांच्या बाजूने लागला. न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हा यांनी त्यांचा निष्पक्ष आणि ऐतिहासिक निर्णय देतांना श्रीमती इंदिरा गांधी यांच्या विजयाला अवैध घोषित करून राजनारायण यांना विजयी घोषित केले होते. इतकेच नव्हे, तर इंदिरा गांधी यांच्यावर पुढील ६ वर्षांपर्यंत निवडणूक लढण्यावर बंदी घातली होती; पण हुकुमशाही वृत्तीच्या आणि ‘या देशाच्या पंतप्रधानपदी बसण्याचा केवळ गांधी, नेहरू घराण्यालाच अधिकार आहे’, अशी पक्की धारणा असणार्‍या इंदिरा गांधी यांनी या निर्णयाला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले. आपले पंतप्रधानपद सोडण्यास नकार दिला. याविरुद्ध लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन संपूर्ण देशभर एक प्रचंड आंदोलन उभारले. इंदिरा गांधीच्या त्यागपत्राच्या मागणीला जोर चढला. अखेर हातातील सत्तेचा गैरवापर करून आणि देशाची सुरक्षा धोक्यात आल्याचे कारण दाखवून राज्यघटनेतील कलम ३५२ (१) खाली इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ या दिवशी देशात आणीबाणी घोषित केली !

२. आणीबाणीतील अन्याय !

श्री. शंकर गो. पांडे

भारतातील लोकशाही स्थगित करून प्रशासनाचे सर्व अधिकार त्यांच्या कह्यात घेतले. सर्व प्रसारमाध्यमांचे अधिकार हिरावून घेतले. रा.स्व. संघासारख्या देशभक्त संघटनेवर बंदी घातली. जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई, जॉर्ज फर्नांडिस, रा.स्व. संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस, रा.स्व. संघ, विश्व हिंदु परिषद आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे लाखो कार्यकर्ते या सर्वांना त्वरित अटक करून कारागृहात डांबले. त्यानंतर २१ महिने, म्हणजे २१ मार्च १९७७ पर्यंत ही आणीबाणी देशात लागू होती.

२१ मार्च १९७७ या दिवशी आणीबाणी उठवल्यानंतर भारतात लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या. या निवडणुकीमध्ये जनता दलाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव झाला. जनता दलाचे नेते मोरारजी देसाई भारताचे काँग्रेसतर पंतप्रधान झाले. या निवडणुकीत रायबरेली या गांधी घराण्यासाठी राखीव असलेल्या मतदारसंघातूनही इंदिरा गांधी यांचा पराभव झाला.

३. भारताला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ घोषित करणे !

आणीबाणीच्या काळात सर्व विरोधक कारागृहात असतांना त्यांच्या अनुपस्थित हिंदूंना नामोहरम करण्यासाठी इंदिरा गांधी आणि त्यांच्या हिंदुद्वेष्ट्या सहकार्‍यांनी एक घटनादुरुस्ती केली. त्यांनी राज्यघटनेच्या ४२ व्या कलमामध्ये ‘निधर्मी (सेक्युलर)’ हा शब्द घुसवला आणि भारत भविष्यात ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होऊ नये; म्हणून भारताला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ म्हणून घोषित केले. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत ‘सेक्युलर’ (निधर्मी) हा घातक शब्द समाविष्ट करण्यास नकार देऊन जो ‘विवेक’ दाखवला होता, त्या विवेकाला मूठमाती देऊन इंदिरा गांधी यांनी भारतातील हिंदूंचा घात केला.

४. हिंदूंसह त्याचे उपपंथ मुळातच धर्मनिरपेक्ष असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाणणे !

डॉ. बाबासाहेबांना ठाऊक होते की, या देशातील हिंदु, बौद्ध, जैन, शीख हे समाज मुळातच सहिष्णु आहेत आणि त्यांच्या धर्माप्रमाणे इतर धर्मांचा सारखाच आदर करणारे आहेत. त्यामुळे पाश्चात्त्य देशातील धर्मनिरपेक्षतेची संकल्पना या देशाने स्वीकृत करण्याची आवश्यकता नाही. डॉ. बाबासाहेब ‘सर्वच धर्मियांना, पंथ, संप्रदाय यांना समान वागणूक आणि अधिकार मिळावे’, या मताचे होते. डॉ. बाबासाहेबांना मुसलमानांच्या धर्मांध आणि कट्टर मानसिकतेची पूर्ण जाणीव होती. मुसलमानांच्या या मानसिकतेवर त्यांची मते कडवी आणि स्पष्ट होती. त्यांची मते त्यांनी वेळोवेळी त्यांच्या पुस्तकातून मांडली आहेत. राज्यघटनेत ‘सेक्युलर’ शब्द घुसवून ते मुसलमानांच्या हातात कोलीत देऊ इच्छित नव्हते; पण हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी हे कोलीत मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या हातात दिले.

५. ‘धर्मनिरपेक्ष’ संज्ञा विपरीत अर्थाने वापरली गेल्याचे परिणाम !

बरे या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाप्रमाणे भारतात सर्व धर्मांना आणि धर्मियांना शासनाकडून समान वागणूक अन् अधिकार तरी देण्यात येतात काय ? तर तेही नाही. हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी धर्मनिरपेक्षतेचा लावलेला अर्थ अत्यंत विकृत आणि विपरीत आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे ‘येथील बहुसंख्य असणार्‍या हिंदूंचा त्यांच्या धर्म, देवीदेवता, मंदिरे, धर्मग्रंथ, सण-उत्सव आणि श्रद्धास्थानांचा अपमान करणे, त्यांचे मूलभूत अधिकारही हिसकावून घेत त्यांना दुय्यम आणि हीन दर्जाची वागणूक देणे अन् याउलट मुसलमान, तसेच ख्रिस्ती यांचे हवे तसे लाड करणे, त्यांच्यावर सोयीसवलतींचा वर्षाव करणे, त्यांचे वैयक्तिक जीवन आणि धार्मिक स्थळे यांविषयी वेगळे कायदे करणे, त्यांची देशद्रोही वक्तव्ये आणि कृती यांकडे दुर्लक्ष करणे होय !’ धर्मनिरपेक्षतेचा असा विकृत अर्थ हिंदुद्वेष्टे नेते लावत असल्यामुळे आज भारतात मुसलमानांचा नंगा नाच चालू आहे. या देशात हिंदु बहुसंख्य असूनही तोच विस्थापित होत आहे, त्याचेच जीवन आणि वित्त असुरक्षित झाले आहे.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.