
देव ग्रहण करतो नैवेद्य. दिसत तर नाही कधी ? नामदेव महाराजांना दिसला की ! त्यांचा तेवढा अधिकार होता हो. आमचे काय ? आमच्या हातून कुठे देव ग्रहण करतांना दिसणार आम्हाला ? दिसायला का हवा ? थेट अनुभव घ्या की ! कसा बरे ? भगवंत काय म्हणतात पहा,
नैवेद्यं पुरतो ह्यस्तं चक्षुषा गृह्यते मया ।।
रसं च दासजिह्वायां अश्नामि कमलोद्भव ।।

‘हा समोर ठेवलेला नैवेद्य मी डोळ्यांनी ग्रहण केला. अन्न आपण आधी डोळ्यांनी चाखतो. भगवंत तर त्यातील तेजस भाग थेट तेज महाभूताने बनलेल्या चक्षुंनी ग्रहण करतात.’ पुढे ते म्हणतात, ‘चव कशी पहातो, तर जो भक्त त्याचे ग्रहण करतो, त्याच्या जिव्हेने मी चवीचा आस्वाद घेतो !’ म्हणूनच देवाला दाखवून झालेला नैवेद्य स्वीकारतांना आपण त्याला ‘प्रसाद’ म्हणतो. त्याला नैवेद्य म्हणत नाही ! संपूर्ण पान वाढून नैवेद्य दाखवल्यावर तो प्रसाद घरातील कर्त्या व्यक्तीने ग्रहण करण्याची प्रथा तिथूनच आली. त्याच्या रूपाने भगवंतच सेवन करत असल्याने. पुन्हा आपल्या उदरात जठराग्नीच्या रूपात भगवंत असतातच की. ‘प्रसादाला नावे ठेवू नयेत’, असे म्हणतात, यामागे हेच कारण आहे की, आपण केवळ माध्यम असतो. प्रत्यक्षात देवच ग्रहण करत असतो. अन्नग्रहणाला आपण थेट यज्ञकर्म मानतो. आपल्याकडे उगाच हवाबाजी काही नाही. नीट लक्षात घेतले, तर खोलवरचा तर्क लक्षात येतो. तो तर्क जिथे तत्त्वज्ञानात परावर्तित होतो, त्या अंतिम अर्काला म्हटले आहे – अद्वैत वेदांत !
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
प्रेमप्रकरण कि हृदयातील कपट ?
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?