UP 94 Illegal Madrassas : अलीगड (उत्तरप्रदेश) येथील ९४ बेकायदेशीर मदरसे बंद होणार !

मदरशांतील २ सहस्र मुले सरकारी शाळांमध्‍ये शिकणार !

अलीगड (उत्तरप्रदेश) – अलीगड जिल्‍हा प्रशासनाने जिल्‍ह्यातील ९४ मदरशांची पडताळणी करून त्‍यांना बेकायदेशीर घोषित केले आहेत. हे सर्व बंद करण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत. या मदरशांमध्‍ये शिकणार्‍या सुमारे २ सहस्र विद्यार्थ्‍यांना सरकारी शाळांमध्‍ये हालवण्‍यात येणार आहे.

जिल्‍हा अल्‍पसंख्‍यांक अधिकारी निधी गोस्‍वामी यांनी प्रसारमाध्‍यमांना सांगितले की, पडताळणीची व्‍याप्‍ती वाढवण्‍यासाठी मान्‍यताप्राप्‍त मदरशांतील शिक्षकांनाही पथकात समाविष्‍ट करण्‍यात आले आहे. बेकायदेशीरपणे चालू असलेल्‍या मदरशांची सूची सिद्ध करण्‍यासाठी हे मदरसा शिक्षक प्रशासनाला साहाय्‍य करतील.

संपादकीय भूमिका

संपूर्ण देशातील बेकायदेशीर मदरसे बंद करण्‍यासह सर्वच मदरशांना देण्‍यात  येणारे सरकारी अनुदानही बंद केले पाहिजे !