नालासोपारा येथे कथित स्‍फोटके बाळगल्‍याच्‍या प्रकरणातील आणखी ५ जणांना जामीन !

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – नालासोपारा येथे कथित स्‍फोटके बाळगल्‍याच्‍या प्रकरणात मुंबई उच्‍च न्‍यायालयाने ३० जुलै या दिवशी संशयित श्रीकांत पांगारकर, अमित बद्दी, गणेश मिस्‍कीन, सुजित रंगास्‍वामी आणि भरत कुरणे या ५ जणांना जामीन संमत केला.

या प्रकरणातील संशयित अविनाश पवार यांना ऑगस्‍ट २०२२ मध्‍ये, लिलाधर लोधी आणि प्रताप हाजरा यांना मार्च २०२३ मध्‍ये, तर वैभव राऊत यांना सप्‍टेंबर २०२३ मध्‍ये उच्‍च न्‍यायालयाने जामीन दिला होता. वर्ष २०१८ मध्‍ये आतंकवादविरोधी पथकाने कथित स्‍फोटके बाळगल्‍याच्‍या प्रकरणी वैभव राऊत यांना अटक केली होती. या वेळी आतंकवादविरोधी पथकाने स्‍फोटके जप्‍त केल्‍याचा दावा केला असला, तरी प्रत्‍यक्षात शस्‍त्रे दाखवण्‍यात आली नसल्‍याचा दावा स्‍थानिक नागरिकांनी केला होता. हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी देशाचे सार्वभौमत्‍व धोक्‍यात आणत कथित कट रचल्‍याचा आरोप ठेवून या सर्वांना अटक करण्‍यात आली होती. या प्रकरणातील ४ संशयित अद्यापही कारागृहात आहेत.