Erdoğan On Israel : (म्हणे) ‘आम्ही इस्रायलमध्ये घुसू !’

इस्रायल-हमास युद्धावरून तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचे विधान !

रेसेप तय्यिप एर्दोगन

अंकारा (तुर्कीये) – तुर्कीये पॅलेस्टिनींना साहाय्य करण्यासाठी इस्रायलमध्ये घुसू शकतो, असे विधान तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी केले आहे.

एर्दोगन यांनी रिझ या त्यांच्या मूळ गावी झालेल्या सत्ताधारी एके पक्षाच्या बैठकीत सांगितले, इस्रायल हमासच्या विरोधात चुकीची कामे करू शकत नाही. याविरोधात  आपण फार सशक्त असले पाहिजे. ज्याप्रमाणे आपण काराबाख (अझरबैजानमधील प्रदेश) आणि लिबिया येथे घुसलो होतो, त्याप्रमाणे आपण इस्रायलमध्येही घुसू शकतो.

सद्दाम हुसेन यांच्यासारखी स्थिती होईल ! – इस्रायलचे प्रत्युत्तर

इस्रायलवर आक्रमण करण्याची धमकी देऊन एर्दोगन सद्दाम हुसेन याच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत, अशी चेतावणी इस्रायलचे परराष्ट्रमंत्री इस्रायल कॅट्झ यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून दिलीे. यात त्यांनी सद्दाम हुसेन आणि एर्दोगन यांची छायाचित्रेही प्रसारित केली आहे. ते म्हणाले की, इराकमध्ये काय घडले ? आणि कसे संपले ?, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

संपादकीय भूमिका

इस्रायलमध्ये घुसल्यामुळे होणारे परिणाम हमास गेले काही महिने भोगत आहे. त्यामुळे भारतद्वेषी तुर्कीयेने आत्मघात करून घ्यावाच, असेच भारतियांना तरी वाटेल !