रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिराच्या वेळी मुंबई येथील सौ. प्रविणा पाटील यांना आलेली अनुभूती

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

‘३ ते ७.१.२०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे झालेल्या एका शिबिराला उपस्थित रहाण्याची मला संधी मिळाली. ‘पूर्वी ‘गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) उच्छ्वास हा आपला श्वास आहे’, असा भावप्रयोग करायला साधक सांगायचे. तेव्हा मला तसा भाव ठेवायला कधी जमले नाही; परंतु रामनाथी आश्रमात प्रत्यक्ष गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) वास्तव्य असल्याने इथल्या कणाकणात मला त्यांचे चैतन्य जाणवते. त्यामुळे ‘त्यांचा उच्छ्वास हाच माझा प्रत्येक श्वास आहे’, हा भाव माझ्या मनात सातत्याने होता. तेव्हापासून माझ्या उत्साहामध्ये पुष्कळ वाढ झाल्याचे मला जाणवत आहे. गुरुदेवांच्या अपार कृपेमुळेच मला हे सर्व अनुभवता आले.’

– सौ. प्रविणा पाटील, मुंबई (४.१.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक