आश्रम म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विशाल रूप असून त्यांनी आश्रमात प्रत्येक जिवाचे वात्सल्यभावाने स्वागत करणे !

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. आश्रमात प्रवेश करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले विशाल रूपात हात पसरवून उभे असलेले दिसणे

‘१५.११.२०२२ या दिवशी मी आश्रमात आल्यावर पाय धुऊन आश्रमात प्रवेश करत असतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले विशाल रूपात हात पसरवून उभे असलेले दिसले. प्रत्यक्षात ते तेथे नव्हते; पण उघड्या डोळ्यांनी हे दृश्य मला दिसले. तेव्हा मी काही प्रार्थना केली नव्हती किंवा वेगळा भाव नव्हता ठेवला.

२. आश्रम म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले असून त्यांनी प्रत्येक जिवाला कुशीत घेणे

होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी

‘आई जशी बाळाला कुशीत घेण्यासाठी दोन्ही हात पसरते, त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून आश्रमात येणार्‍या प्रत्येक जिवाचे वात्सल्यभावाने स्वागत करत आहेत’, असे मला दिसले. मला ही अनुभूती या ८ ते १० दिवसांत ४ – ५ वेळा आली. तेव्हा माझे मन भरून आले आणि पुष्कळ कृतज्ञता दाटून आली. पहिल्यांदा ते मला दिसले तेव्हा पुष्कळ आनंद झाला आणि तो आनंद बराच काळ टिकून होता. आता मात्र ही अनुभूती येतांना कृतज्ञतेने माझी भावजागृती होते. हा आश्रम म्हणजे परात्पर गुरु डॉक्टर आहेत आणि येणार्‍या प्रत्येक जिवाला ते आपल्या कुशीत घेतात, हे सत्यच आहे. प्रत्येकाला आश्रमात प्रवेश केल्यावर हे जाणवते.

३. आश्रमात प्रवेश करतांना पाहुण्यांना जाणवणारी वेगळी ऊर्जा परमेश्वरस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांची असणे

आश्रमात प्रवेश करतांना येणारे पाहुणे म्हणतात, ‘‘येथे प्रवेश केल्या केल्या वेगळीच ऊर्जा जाणवते.’’ ‘ती ऊर्जा, म्हणजे परमेश्वरस्वरूपी परात्पर गुरु डॉक्टर आहेत’, याची प्रचीती भगवंताने देऊन मला कृतार्थ केले. कृतज्ञ आहे भगवंता !’

– होमिओपॅथी वैद्या (सुश्री) आरती तिवारी, फोंडा, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक