वाराणसी (उत्तरप्रदेश) – चंदौली आणि वाराणसी यांच्या सीमेवर दागिन्यांच्या एका व्यापार्याला २२ जूनच्या रात्री लुटण्यात आले होते. व्यापार्याकडून एकूण ४२ लाख ५० सहस्र रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणात पोलिसांनी पोलीस निरीक्षक सूर्य प्रकाश पांडे आणि त्याचे इतर २ साथीदार यांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून ८ लाख ५ सहस्र रुपये रोख, ३२ बोअरची २ पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि घटनेत वापरलेली एक दुचाकी जप्त केली.
२२ जूनच्या रात्री पोलीस निरीक्षक सूर्यप्रकाश पांडे याने कटारिया पेट्रोल पंपाजवळ एक बस थांबवली. बस थांबवल्यानंतर पोलीस निरीक्षक पांडे याने बसमधील प्रवासी व्यावसायिकाची चौकशी केली. पांडे याने व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडील ४२ लाख ५० सहस्र रुपये लुटले.
संपादकीय भूमिकाजनतेचे रक्षक नव्हे, भक्षक पोलीस ! अशांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी ! |