अलीगड – उत्तरप्रदेशातील अलीगड मुस्लिम विद्यापिठातील कर्मचार्यांवर विद्यापिठातील वैद्यकीय वसाहतीमध्ये गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात २ कर्मचारी घायाळ झाले आहेत. घायाळ कर्मचार्यांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. विद्यापिठाच्या वैद्यकीय वसाहतीमध्ये पोलीस अधिकारी फौजफाट्यासह उपस्थित आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून २ आरोपींना कह्यात घेतले असून या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
अलीगड मुस्लिम विद्यापिठाचे शिस्तविषयक अधिकारी डॉ. वसीम अली यांनी सांगितले की, विद्यापिठाच्या निबंधक कार्यालयात सेवा बजावणार्या २ कर्मचार्यांवर २४ जुलैला सकाळी ९.३० वाजता आक्रमणकर्त्यांनी गोळीबार केला. गोळी लागल्याने दोन्ही कर्मचारी घायाळ झाले.