उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. कृष्णराज ठोमके आणि कु. आनंदिता श्रीवास्तव हे या पिढीतील आहेत !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
चि. कृष्णराज प्रतीक ठोमके याची आजी (वडिलांची आई) सौ. उमा ठोमके यांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. जन्मापूर्वी
१ अ. सूनेने गर्भारपणात नामजप आणि सेवा करणे : ‘सून सौ. आरती गर्भारपणात पोटावर हात ठेवून नामजप करत असे आणि जमेल, तशी सेवाही करत असे.
२. जन्मानंतर
२ अ. वय जन्म ते ३ मास
२ अ १. बाळाला प्रथमच पहातांना कुटुंबियांचा नामजप चालू होणे : बाळाचा जन्म झाल्यावर त्याला प्रथमच पहातांना ‘आमचे नामस्मरण चालू झाले’, असे आम्हा कुटुंबियांना जाणवले.
२ अ २. बाळ कृष्णराजला जवळ घेऊन नामजप करतांना आलेल्या अनुभूती : कृष्णराज २ मासांचा असतांना त्याला घेऊन आम्ही सर्व जण श्रीकृष्णाचा नामजप करत होतो. तेव्हा ‘प्रत्यक्ष श्रीकृष्ण आमच्याकडे बघून बोलत आहे’, असे आम्हाला वाटत होते. कृष्णराजच्या बहिणींना श्रीकृष्णाच्या बासरीचा नाद ऐकू येत होता.
३. वय ४ ते ६ मास
३ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव आणि नंतर झालेले यज्ञ एकटक पहाणे : आम्ही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांचा ब्रह्मोत्सव आणि नंतर झालेले यज्ञ यांचे थेट प्रक्षेपण पहात होतो. ब्रह्मोत्सव पहातांना आणि यज्ञातील दुर्गासप्तशतीचे मंत्र चालू असतांना कृष्णराज एकटक बघत हुंकार देत होता.
४. वय ७ ते ९ मास
४ अ. सद्गुरु स्वाती खाडये यांच्याकडे आकृष्ट होणे : कृष्णराज ७ मासांचा असतांना सद्गुरु स्वाती खाडये आणि आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे (वर्ष २०२३ ची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) आमच्या घरी आल्या होत्या. तेव्हा कृष्णराजची झोपेची वेळ असूनही तो त्यांच्याकडे एकटक पहात शांतपणे त्यांच्या मांडीवर बसला होता.
५. वय १० ते १२ मास
५ अ. नामजप उच्चारण्याचा प्रयत्न करणे : कृष्णराज १० मासांचा असतांना भ्रमणभाषवर भजन किंवा नामजप लावल्यावर तो तसाच उच्चार करायचा प्रयत्न करत असे.
६. वय १ ते सव्वा वर्ष
६ अ. आरती करतांना घंटा वाजवायला हवी असणे : आम्ही सर्व जण मिळून सकाळी गणपतीची आरती म्हणत असतांना कृष्णराज घंटा वाजवण्यासाठी मागतो.
– सौ. उमा ठोमके (चि. कृष्णराजची आजी (वडिलांची आई)), कोल्हापूर. (५.३.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.